अल्पवयीनाचा समावेश असलेली चोरट्यांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:29 PM2019-02-11T22:29:00+5:302019-02-11T22:29:32+5:30
शहर पोलिसांनी खात्रिदायक माहितीच्या आधारे काही तरुणांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या तपासात या चोरट्यांच्या टोळीत एका अल्पवयीनाचा समावेश असल्याचे पुढे आले असून त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहर पोलिसांनी खात्रिदायक माहितीच्या आधारे काही तरुणांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या तपासात या चोरट्यांच्या टोळीत एका अल्पवयीनाचा समावेश असल्याचे पुढे आले असून त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अस्लम खाँ इब्राहीम खॉ हे त्यांच्या गोलबाजार येथील दुकानात मित्राला बसवून बाहेर गेले असता दोन अज्ञातांनी दुकानात येत दुकानातून १५ हजारांची रोख पळविली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला असता गोपनीय माहितीच्या आधारे सुरूवातीला धिरज श्याम गौतम (२६) रा. इतवारा बाजार आणि उमेश गणपत मलये (३६) रा. गोंड प्लॉट यांना तब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आपल्यासोबत प्रज्वल ऊर्फ वडा मधुकर पिंपरे (३०), तरूण दिनेश मडावी (१९) तसेच एक विधीसंघर्षित बालक सर्व रा. नागपूर असल्याचे सांगितले. त्या आधारे पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, दोन मोबाईल व इतर असा एकूण ६३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधीकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने, सहाय्यक फौजदार दत्तात्रय ठोंबरे, सचिन इंगोले, सचिन धुर्वे, संजय पटले, विशाल बंगाले, दिनेश राठोड, अनूप कावळे, अक्षय राऊत यांनी केली.