कचरा कृती साक्षरता अभियानात निवृत्तांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 11:47 PM2017-09-16T23:47:16+5:302017-09-16T23:49:03+5:30
कचरा व्यवस्थापन हा विषय महत्त्वाचा ठरत आहे. ही गरज लक्षात घेत आधारवड या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेने कचरा व्यवस्थापन जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक समितीही गठित केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कचरा व्यवस्थापन हा विषय महत्त्वाचा ठरत आहे. ही गरज लक्षात घेत आधारवड या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेने कचरा व्यवस्थापन जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक समितीही गठित केली आहे. पिपरी (मेघे) येथील आचार्य श्रीमन्नारायण तंत्रनिकेतनने कचरा कृती साक्षरता अभियान सुरू केले आहे. आधारवडने पुढाकार घेत या उपक्रमातही सहभाग घेतला आहे.
कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली, खानपानाच्या बदलत्या सवयी, प्लास्टिकचा वाढता वापर, लोकांची उदासीन वृत्ती आदी कारणांमुळे कचºयाचे प्रमाण वाढत आहे. दुर्गंधी व हानिकारक वायंूमुळे सामान्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. ओला कचरा कुजल्यानंतर निर्माण होणारा मिथेन हा ज्वलनशील वायू कार्बन वायुपेक्षाही घातक आहे. सुका कचरा जाळल्याने होणारा धूर वायू प्रदूषणाचे कारण ठरला आहे. वास्तविक, कचºयाची विल्हेवाट लावणे नगर परिषदेचे कर्तव्य आहे; पण कचरा गोळा केल्यानंतर तो साठवून ठेवण्यासाठी पालिकेला जागा अपुरी पडत आहे. शिवाय ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याचा प्रश्न आहे. यामुळे कचºयाची व त्याच्याशी निगडीत स्वच्छतेची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. यामुळे तंत्रनिकेतन तथा आधारवडने कचरा व्यवस्थापन जनजागृती अभियानच हाती घेतले.
या उपक्रमाची रूपरेषा व कृती योजना तयार करण्यासाठी कचरा व्यवस्थापन समितीची सभा सेवानिवृत्त अभियंता किशोर देवतारे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. सभेला आचार्य श्रीमन्नारायण पॉलिटेक्निक पिपरीच्य घनकचरा व्यवस्थापन अभ्यास प्रकल्पाचे अभियंता प्रा. आशिष चव्हाण, शंभरकर, नयना पाटील मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी ओला व सुका कचरा वेगळा कसा करावा, ओल्या कचºयापासून कंपोस्ट खत कसे तयार करावे, त्यासाठी डस्टबीनचा वापर कसा करावा याबाबत माहिती दिली. सभेला आधारवडचे संस्थापक श्यामकांत देशपांडे, सचिव चंद्रशेखर दंडारे, सदस्य अॅड. मोहन देशपांडे, अॅड. नारायण भोयर, गिरीष उपाध्याय, किशोर देवतारे, अरुण महाबुधे, शेखर सोळंके, जनार्दन जगदाळे, चित्रा देशमुख, ज्योती देवतारे, सुनील हनमंते, कट्टाचे विकास गुज्जेवार, देवेंद्र कहाते आदी उपस्थित होते.
कचरा व्यवस्थापन समितीचे मुख्य संघटक म्हणून श्यामकांत देशपांडे, संयोजक चित्रा देशमुख, ज्योती देवतारे यांची निवड करण्यात आली. कचरा व्यवस्थापनासाठी उपयोगी विशिष्ट डस्टबीन तयार केले. या कार्यात सर्व संघटना व नागरिकांनी सहकार्य करावे, शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे, सार्वजनिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन प्रा. शेख हाशम यांनी केले आहे.