उत्खननातील खड्डे झाले ‘गार्बेज झोन’

By admin | Published: April 2, 2016 02:37 AM2016-04-02T02:37:59+5:302016-04-02T02:37:59+5:30

शहरालगतचा बराचसा भूभाग हा उंचसखल टेकड्यांनी व्यापला आहे. पिपरी (मेघे), उमरी (मेघे) भागाला या टेकड्यांचा वेढा आहे.

Garbage zone in excavation | उत्खननातील खड्डे झाले ‘गार्बेज झोन’

उत्खननातील खड्डे झाले ‘गार्बेज झोन’

Next

टेकड्यांच्या उत्खननामुळे निसर्गाचे दोहन : पिपरी (मेघे), उमरी (मेघे) परिसरातील प्रकार
श्रेया केने वर्धा
शहरालगतचा बराचसा भूभाग हा उंचसखल टेकड्यांनी व्यापला आहे. पिपरी (मेघे), उमरी (मेघे) भागाला या टेकड्यांचा वेढा आहे. अनेक वर्षांपासून या टेकड्या पोकलँडच्या सहाय्याने पोखरण्यात येत आहे. त्यामुळे येथे या परिसरात मोठमोठे खड्डे नजरेस पडतात. विशेष म्हणजे या खड्ड््यांचा उपयोग आता मंगल कार्यालयांमधील जमा होत असलेला कचरा टाकण्यासाठी होत आहे. त्यामुळे इतिहासजमा होत असलेल्या टेकड्या आणि यातील खड्ड्यांमधील कचरा एक नवीनच समस्या निर्माण होत आहे.
नैसर्गिक संसाधनावर मानवी वस्तीचे होत असलेले अतिक्रमण वाढतच आहे. कुठलाही परिसर हा सर्वत्र सपाट नसतो. कुठे तो उंचसखल तर कुठे मैदानी असतो. यामुळे भूभागाचे संतुलन कायम राहते. या उंच भागालाच आपण टेकड्या, जास्त उंच भागाला पर्वत तर केवळ मातीच्या उंच भागाला गढी असे संबोधले जाते. नैसर्गिकदृष्ट्या त्याची निर्मिती झाल्याने निसर्गाचे संतुलन राखले जाते. परंतु मानवी शिरकाव जंगलांपर्यंत झाल्याने मानवी वस्तीबाहेर असलेल्या या टेकडी आणि गढी शहरात, गावांत दाखल झाली. त्यांच्याभोवताल वस्त्यांची संख्या वाढू लागली. घरांच्या बांधकामाकरिता या टेकड्यांना पोखरुन मुरूम आणि गढींमधील माती उपयोगात आणल्या जाऊ लागली. याचे प्रमाण वाढल्याने यावर निर्बंध लादण्यात आले. तसेच यामुळे संबंधित प्रशासनाला महसूलही मिळाला. हे उत्खनन मात्र या टेकड्यांच्या मुळावर उठले असून त्यामुळेही या टेकड्यांचे अतोनात दोहन होत आहे. वर्धा शहरानजिक पिपरी (मेघे) आणि उमरी(मेघे) हा परिसर टेकड्यांनी व्यापला आहे. या टेकड्यांचा मुरुमाचा उपयोग घराच्या बांधकामात जोत्यात भराईसाठी केला जातो. परिणामी अवैध उत्खनन करून मोठ्या प्रमाणात मुरुम मिळवून त्याचा उपयोग वाढला आहे. यासाठी यंत्रांचा वापर वाढला आहे. त्यामुळे या दोन्ही परिसरात टेकड्या खोदल्या गेल्याने मोठमोठ खड्डे निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यांचा उपयोग आता शहरातील मंगल कार्यालयातील दुर्गंधीयुक्त प्लास्टिक कचरा टाकण्यासाठी होत आहे. हा कचरा खड्ड्यात लवकर सडत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. परिणामी निसर्गाचे दोन्ही प्रकारे दोहन होत आहे. या अवैध उत्खननाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

गढ्या होताहेत इतिहासजमा
पूर्वी अनेक गावे गढ्यांची गावे म्हणून ओलखली जात. पण कालौघात घरांच्या अतिक्रमणामुळे यातील माती खोदून नेल्यामुळे तर कधी गुप्तधनाच्या हव्यासापोटी गढ्यांचे उत्खनन होत राहिले. परिणामी गढ्या नामशेष होत आहेत.
ग्रामीण भागात आजही गढ्यांचे उरलेसुरले अवशेष आपल्या अस्तित्वाची साक्ष देत आहेत. या गढ्यांचे संवर्धन करण्याची आज गरज असून त्याकरिता उपाय करणेही महत्त्वाचे आहे
टेकड्या व गढ्यांच्या निर्मिती ही नैसर्गिकरित्या होत असते. त्यामुळे निसर्गाचे संतुलन कायम राहते. गावांतील गढ्यादेखील नद्यांच्या आसपास आढळतात. त्यामुळे गावात नदीच्या पुराचे पाणी शिरत नाही
दिवसेंदिवस या गढ्याचे दोहन होत असल्याने पुराला अटकाव करणारी ही नैसर्गिक यंत्रणाच नष्ट होत आहे. याचा परिणामही ग्रामीण भागातील नागरिक सोसत आहे. टेकड्यांमुळे भूजल पातळी कायम राहते. पण अवैध उत्खननाने भूजल पातळी देखील खालावत आहे.

Web Title: Garbage zone in excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.