गॅस सिलिंडरने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:01 PM2018-11-05T22:01:02+5:302018-11-05T22:01:39+5:30

स्थानिक मालगुजारी पुरा भागातील रहिवासी सुनील शर्मा यांच्या घरातील गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. ही घटना त्यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडा-ओरड केली. दरम्यान परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

Gas cylinders take belly | गॅस सिलिंडरने घेतला पेट

गॅस सिलिंडरने घेतला पेट

googlenewsNext
ठळक मुद्देमालगुजारीपुरा भागातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक मालगुजारी पुरा भागातील रहिवासी सुनील शर्मा यांच्या घरातील गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. ही घटना त्यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडा-ओरड केली. दरम्यान परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
सुनील शर्मा यांच्या घरातील महिला दिवाळी सणाच्या निमित्ताने घरात विविध खाद्यपदार्थ तयार करीत होत्या. याच दरम्यान अचानक गॅस सिलिंडरने रेग्यूलेटरच्या बाजूने अचानक पेट घेतला. गॅस सिलिंडरने आग पकडल्याने शर्मा कुटुंबातील महिलांनी तात्काळ घराबाहेर पडत घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत मिळेल त्या साहित्याचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या या प्रयत्नाला वेळीच यश आल्याने पुढील अनर्थ टळला.गॅस सिलिंडरला लागलेल्या आगीने बघता-बघता परिसरातील साहित्याला आपल्या कवेत घेण्यास सुरूवात केली होती. परंतु, वेळीच ही परिस्थिती आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या धाडसी तरुणांच्या निदर्शनास येताच त्यांनी आगीवर पाण्याचा मारा करून त्यावर नियंत्रण मिळविले.
अग्निशमन बंबाची एन्ट्री लेटच
आग लागल्याची माहिती काही नागरिकांनी न.प.च्या अग्निशमन विभागाला दिली. परंतु, तात्काळ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला नव्हता.

Web Title: Gas cylinders take belly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.