ग्रा.पं.ना हायटेक होण्याची वाट

By admin | Published: July 7, 2015 01:41 AM2015-07-07T01:41:09+5:302015-07-07T01:41:09+5:30

केंद्रातील मोदी सरकार सध्या गाजावाजा करीत डिजिटल इंडिया सप्ताह साजरा करीत आहे.

Gateway to High Tech | ग्रा.पं.ना हायटेक होण्याची वाट

ग्रा.पं.ना हायटेक होण्याची वाट

Next

ब्रॉड बँडचे भिजत घोंगडे : वर्ष लोटूनही कामे अद्याप खोळंबलेलीच
खरांगणा(मो.) : केंद्रातील मोदी सरकार सध्या गाजावाजा करीत डिजिटल इंडिया सप्ताह साजरा करीत आहे. परंतु देशाचे आधारस्तंभ असलेली गावे आणि तेथील ग्रामपंचायती मात्र हायटेक करण्याकरिता आप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉड बँड इंटरनेट कनेक्टीव्हिीटीने जोडण्याचे काम वर्षाचा कालावधी लोटूनही पूर्णत्वास गेलेले नाही. जिह्यातही हेच चित्र निदर्शनास येते.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गतिमान भारताचे स्वप्न साकारताना ग्रामीण जनताही त्यापासून वंचित राहु नये व शासनाचा कारभारही पारदर्शक व लोकाभिमुख व्हावा या उद्देशाने युपीएच्या काळातच केंद्र शासनाने डिजीटल इंडियाच्या कार्यक्रमाचा पाया रोवला व नॅशनल आप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे भारतातील अडीच लाख ग्रामपंचायती इ-गव्हर्नन्स कनेक्टीव्हिटीने जोडण्याचा प्रकल्प हाती घेतला. भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमीटेड कंपनी स्थापन करून ही कंपनी राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करण्यात आली.
केंद्र शासनाच्या या निर्णयाच्या तीन वर्षे आधीच महाराष्ट्र शासनाने राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती इ- संग्राम योजनेंतर्गत संगणीकृत करून इ- गव्हरनेस-इ-पंचायतसारखे कार्यक्रम राबविणे सुरू केले व इंटरनेटद्वारे ब्रॉड बँड ने जोडण्याचा प्रकल्प हाती घेतला. आप्टीकल फायबर्स केबल टाकण्याचे काम सुरू केले. जिल्ह्यातही ग्रामीण व शहरी भागात रस्त्यांच्या व राजमार्गाच्या बाजूला खड्डे व पाच फुट खोलीच्या लांब नाल्या खोदण्यात आल्या. दोन चार महिन्यानंतर त्यात केसींग पाईप टाकण्यात आले. दरम्यानच्या खोदून ठेवलेल्या नाल्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी मार्ग उखडले. ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन तुटल्या. काही ठिकाणी आजही धोकादायक खड्डे अस्तित्वात आहेत. त्यावर सहा-सात महिने उलटले तरी फायबर केबल टाकण्यात आलेली नाही. सर्व कामे कासवगतीने सुरू आहेत.
कोट्यावधीची तरतूद असूनही कंत्राटदाराकडून करून घेण्यात येणाऱ्या या कामाचे घोडे कुठे अडले हे कळावयास मार्ग नाही. ग्रामीण जनता मात्र ग्रामपंचायत डिजीटल तंत्रज्ञानाने हायटेक केव्हा होईल याची वाट पाहात आहे.(वार्ताहर)

नाल्यांमुळे रस्त्यांचे नुकसान
जिल्ह्यातही ग्रामीण व शहरी भागात रस्त्याच्या व राजमार्गाच्या बाजूला खड्डे व पाच फुट खोलीच्या लांब नाल्या खोदण्यात आल्या. दोन-चार महिन्यानंतर त्यात केसिंग पाईप टाकण्यात आले.
दरम्यानच्या खोदून ठेवलेल्या नाल्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले.
अनेक ठिकाणी मार्ग उखडले. ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन तुटल्या. काही ठिकाणी आजही धोकादायक खड्डे अस्तित्वात आहेत. एवढा प्रकार घडूूनही अद्याप वायर टाकण्याचे काम पूर्णत्वास गेलेले नाही.

Web Title: Gateway to High Tech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.