गौरीच्या स्वागतार्ह बाजारपेठ सज्ज

By Admin | Published: September 19, 2015 03:29 AM2015-09-19T03:29:48+5:302015-09-19T03:29:48+5:30

श्रावण सरला की वेध लागतात ते गौरी, गणेशाच्या आगमनाचे. भाद्रपद मासातील शुद्ध सप्तमीला गौरीची घरोघरी स्थापना केली जाते.

Gauri's welcome market is ready | गौरीच्या स्वागतार्ह बाजारपेठ सज्ज

गौरीच्या स्वागतार्ह बाजारपेठ सज्ज

googlenewsNext

आगमन गौराईचे : अनुराधा नक्षत्राचा मुहूर्त; घरोघरी तयारी पूर्ण
श्रेया केने  वर्धा
श्रावण सरला की वेध लागतात ते गौरी, गणेशाच्या आगमनाचे. भाद्रपद मासातील शुद्ध सप्तमीला गौरीची घरोघरी स्थापना केली जाते. गौरीच्या आगमनाची जय्यत तयारी केली जात असल्याने स्थानिक बाजारपेठेत या काळात ग्राहकांची खरेदीकरिता लगबग दिसते. महालक्ष्मीचा थाटमाटही मोठा असल्याने त्याकरिता लागणारे साहित्य, देवीचा श्रृंगार, प्रसाद यांची खरेदीही तितकीच मोठी असते. गौरीचे आगमन अवघ्या एका दिवसावर आले असून यानिमित्त स्थानिक बाजारपेठेचा घेतलेला आढावा. मात्र सततच्या पावसामुळे अनेक व्यावसायिकांना अडचणी झाल्याचेही दिसून आले.
या काळात गौरी ही तिच्या माहेरी वास्तवास येते, असा उल्लेख पुराणात आणि आख्यायिकात आहे. तीन दिवसांकरिता येणाऱ्या या माहेरवाशीनीच्या आगमनाकरिता घरोघरी गृहिणी नानाविध तयारी करतात. गौरी जिथे विराजित होते ते स्थान फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाई करून सुशोभित केले जाते. ही गौराई कुठे बंगईवर तर कुठे सुशोभित शामियानात स्थापित केली जाते. सासुरवासीचे माहेरी आल्यानंतर जसे स्वागत केले जाते तोच थाट गौराईच्या आगमनाचा असतो. घरोघरी उत्साहाच्या वातावरणात तयारीची लगबग सुरू झाली आहे.
मोत्यांच्या दागिन्यांना पसंती
गौरीचा साजश्रृंगारही विशेष असतो. देवीचा मुकुट, कंबरपट्टा, गळ्यातील दागिणे मोतीचा वापर करून बनविण्यात आली आहे. यंदा मोतीची बनावट असलेल्या दागिण्यांना अधिक मागणी असल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली. यातही श्रीमंती हार, तोडे, लक्ष्मीहार अशी नाविन्यपूर्ण दागिण्यांनी खरेदी अधिक होत आहे. या दागिण्यांची किंमत ३०० रुपये जोडी आहे. पौराणिक मालिकेत मोतीच्या बणावटीचे दागिणे दाखविण्यात येतात. त्यामुळे याचा प्रभाव येथेही दिसून येतो.
गौराईसह झोला, झोलीच्या कपड्यांची खरेदी
गौरीला साडी नेसविण्यात येतात. यासह झोला, झोलीसाठी घागरा, चुनरी, धोती असे पोशाख विक्रीला आहेत. हे पोषाख खास मथूरा, दिल्ली येथून स्थानिक बाजारपेठेत विक्रीकरिता उपलब्ध आहेत. आकर्षक बनावट आणि रंगसंगतीमुळे या पोषाखांची मागणी वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. या पोषाखाची किंमत ३०० रुपये जोडी ते एक हजार रुपयांपर्यंत आहे.
गौरीची सपूर्ण मूर्ती साडेतीन हजारांपर्यंत
संपूर्ण गौरीच्या मूर्तीची किंमत ३ हजार ५०० ते चार हजार रुपयांपर्यंत आहे. गौरीची मांडणी करताना पायली, हात किंवा धड, मुखवटा असते. पायली तीन आकारात उपलब्ध आहे. यातील मोठ्या आकारातील पायली एक हजार रुपयांपर्यंत आहे तरं मध्यम आकारातील ७०० ते ९०० रुपयांना, छोट्या आकारातील पायली ३०० ते ३५० रुपयांना उपलब्ध आहे. मुखवटे ७०० ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहे. हात अकराशे ते दीड हजार रुपयांना आहे. या उत्सवावर महागाईची झळ दिसून येत आहे. वस्तूंची किंमती वाढल्या आहेत. मातीच्या मुखवटे विशेष आकर्षक दिसत नसल्याने पीओपीचे मुखवटे बाजारात विक्रीला असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
स्थापनेचा मुहूर्त
महालक्ष्मीची स्थापना भाद्रपद शुद्ध षष्ठीला दिवसभर अनुराधा नक्षत्र आहे. कुळाचारप्रमाणे गौरीचे आवाहन करावे, शुद्ध सप्तमीला दुपारी २ वाजून २० मिनिटांपर्यंत भद्रा आहे. तरीही देवीला महानैवद्य करण्यास स्थिती अनुकुल आहे, अशी माहिती पंचाग अभ्यासक श्रीराम मगर यांनी दिली.

Web Title: Gauri's welcome market is ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.