गव्हाणखेडीमध्ये गोठ्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 09:14 PM2019-05-12T21:14:20+5:302019-05-12T21:14:54+5:30
तालुक्यातील गव्हाणखेडी येथील शेतकरी सुरेंद्र रमेश उपाध्याय यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील संपूर्ण साहित्य जळाल्याने त्यांचे सुमारे २ लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तालुक्यातील गव्हाणखेडी येथील शेतकरी सुरेंद्र रमेश उपाध्याय यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील संपूर्ण साहित्य जळाल्याने त्यांचे सुमारे २ लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
आग लागल्याचे निदर्शनास येताच गावातील नागरिकांसह पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कनिष्ठ अभियंता भैसारे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे. दिवसेंदिवस जिल्ह्याचा पारा वाढत असून आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. या भागातील शेतशिवारातून गेलेल्या अनेक विद्युत वाहिनी लोंबकाळत आहेत. त्यामुळे थोडाजरी वादळी वारा आल्यास दोन तारांमध्ये घर्षन होते. अशातच आगीची ढिणगी पडून आग लागते. त्यामुळे महावितरणने दुरूस्तीचे काम होती घेण्याची गरज आहे. तशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे. गव्हाणखेडी येथील नुकसानग्रस्त शेतकरी सुरेंद्र उपाध्याय यांना महावितरणचे नुकसानभरपाई देण्याची मागणी आहे.