सामान्य कार्यकर्ता हीच पक्षाची खरी ताकद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 06:00 AM2019-12-16T06:00:00+5:302019-12-16T06:00:13+5:30
खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, सर्वसामान्य जनता मोठ्या आशेने आपल्याकडे बघते आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला यांचे मोठे प्रश्न आहेत. ते प्रश्न आपल्याला सोडविता आले पाहिजे. सत्ता आली म्हणून आनंदोत्सव साजरा करताना जबाबदारी वाढली याचे भानही ठेवले पाहिजे. लोकांच्या विश्वासाला आपल्याला पात्र ठरायचे आहे. म्हणून सर्वांनी पक्ष संघटन आणि जनतेच्या समस्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सर्व संपून जात अस जेव्हा म्हटले जाते तेव्हाच पक्षाला उभारी मिळत असते. सामान्य कार्यकर्ता ही पक्षाची ताकद आहे. खा. शरद पवार यांनी ही ताकद ओळखून सर्वसामान्य कार्यकत्यांचे हित जोपासले आहे. मोठ्या जडणघडणीतून पक्ष उभा झाला आहे. कधी नव्हे एवढी ताकद तरूणांनी शरद पवार यांच्या मागे उभी केली. या विश्वासाचे सार्थक आपल्याला करायचे आहे. सामान्य कार्यकर्ता ही पक्षाची ताकद असून पक्ष संघटन बांधणीसह त्याच्या मजबुतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन राकाँच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी केले.
स्थानिक बजाज चौक भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला खा. सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन राकाँच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर माजी आमदार सुरेश देशमुख, राजू तिमांडे, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, लक्ष्मीकांत सोनवने, महिला अध्यक्षा शरयु वांदीले, धनराज तेलंग, क्रांती धोटे, सलील देशमुख, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांची उपस्थिती होती.
खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, सर्वसामान्य जनता मोठ्या आशेने आपल्याकडे बघते आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला यांचे मोठे प्रश्न आहेत. ते प्रश्न आपल्याला सोडविता आले पाहिजे. सत्ता आली म्हणून आनंदोत्सव साजरा करताना जबाबदारी वाढली याचे भानही ठेवले पाहिजे. लोकांच्या विश्वासाला आपल्याला पात्र ठरायचे आहे. म्हणून सर्वांनी पक्ष संघटन आणि जनतेच्या समस्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सुनील राऊत म्हणाले की, येत्या तीन महिन्यात नागपूर व अमरावती विभाग यांच्या दोन दिवसीय कार्यकर्त्याचे शिबिर आयोजित करून विदर्भात पक्षात चैतन्य निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याला खा. सुप्रिया सुळे यांनीही दुजोरा देत येत्या अधिवेशनात खा. शरद पवार यांच्याकडे सदर शिबिराचा प्रस्ताव ठेवून त्यावर सकारात्मक चर्चा करण्याचे सांगितले. या कार्यक्रमादरम्यान खा. सुप्रिया सुळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अनंत झाडे, गोपाळ मरसकोल्हे, सुनील भोगे, मिलिंद हिवलेकर, माधवी साबळे, वीणा दाते, शारदा केने, अर्चना मोरे, देशमुख, कुºहाडकर, टी. सी. राऊत, संजय काकडे, संदीप भांडवलकर, अंबादास वानखेडे, सुनील हेटे, कवडु बुरंगे, लईक फारूकी, मुन्ना झाडे, प्रशांत कुत्तरमारे, सोनल ठाकरे, सुरज देवळीकर यांच्यासह राकाँचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.