मेळावे घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:13 PM2018-06-25T23:13:26+5:302018-06-25T23:13:55+5:30

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही उत्तम आहे. मात्र, बँकांचे अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मेळावे घेवून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले. ते भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.

Get the loan waiver benefits to farmers by taking a rally | मेळावे घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून द्या

मेळावे घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून द्या

googlenewsNext
ठळक मुद्देरामदास तडस : भारतीय जनता पक्षाची जिल्हा कार्यकारिणी सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही उत्तम आहे. मात्र, बँकांचे अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मेळावे घेवून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले. ते भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.
व्यासपीठावर आ. अनिल सोले, भाजपाचे पूर्व विदर्भ संघटन महामंत्री उपेद्र कोटेकर, माजी खा. विजय मुडे, माजी आमदार दादाराव केचे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, जि.प. अध्यक्ष नितिन मडावी, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना वानखेडे, भुपेंद्र शहाणे, अविनाश देव, किशोर दिघे, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, प्रशांत बुरले, किसान मोर्चाचे प्रशांत इंगळे तिगावकर किसान, राहुल चोपडा, प्रणव जोशी आदींची उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना आ. अनिल सोले यांनी महाराष्ट्र शासनचे यंदाच्या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवले आहे. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी वृक्ष लागवड बाबत जनजागृती करण्यासाठी 'वृक्ष दिंडी' २८ जूनला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चिचगाव तालुका देवळी येथून निघणार आल्याचे सांगत या वृक्षदिंडीचा समारोप नागपूर येथ ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगितले. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी बुथ रचनेवर भर देत 'एक बुथ पंचवीस युवा' या कार्यक्रमाची माहिती दिली. माजी आमदार दादाराव केचे यांनी कार्यकर्ता हाच पक्षाचा प्राण आहे, असल्याचे सांगितले. याप्रसंगी उपेंद्र कोटेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
नगराध्यक्षांचा गौरव
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या उपक्रमात वर्धा न.प.ने उल्लेखनिय कार्य केल्यामुळे वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर समुद्रपूर नगरपंचायतीच्या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून तेथील नगराध्यक्ष गजानन राऊत यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी शिला सोनोरे यांनाही सन्मानित करण्यात आले.

Web Title: Get the loan waiver benefits to farmers by taking a rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.