आश्वासनांच्या पूर्ततेसाठी संघटित व्हा

By admin | Published: September 13, 2015 02:00 AM2015-09-13T02:00:56+5:302015-09-13T02:00:56+5:30

शासनाने दिलेली आश्वासने मिळवून घ्यायची असेल तर सर्वांनी आधी संघटित व्हा, असे प्रतिपादन आयटकचे राज्य सचिव श्याम काळे यांनी केले.

Get organized to fulfill promises | आश्वासनांच्या पूर्ततेसाठी संघटित व्हा

आश्वासनांच्या पूर्ततेसाठी संघटित व्हा

Next

श्याम काळे : आयटकचे जिल्हा अधिवेशन
वर्धा : शासनाने दिलेली आश्वासने मिळवून घ्यायची असेल तर सर्वांनी आधी संघटित व्हा, असे प्रतिपादन आयटकचे राज्य सचिव श्याम काळे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेचे जिल्हा अधिवेशन गुरूवारी मनोहर पचारे यांच्या अध्यक्षतेत बच्छराज धर्मशाळेत पार पडले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. उद्घाटन गुणवंत डकरे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक आयटकचे कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केले. यावेळी अस्लम पठाण, सुजाता भगत, वैशाली नंदरे, प्रतिभा वाघमारे, स्मीता मसे, वैशाली जाधव, सुचीता काठुके, योगीता डहाके आदी उपस्थित होते. यावेळी संघटनेची कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्षपदी संध्या म्हैसकार, कार्यध्यक्ष गुणवंत डकरे, उपाध्यक्ष सुचीता काठुके, रत्ना मुळे, रंजना मोहितकर, सचिव प्रतिभा वाघमारे, सहसचिव ज्योती वाघमारे, ज्योत्स्ना मुंजेवार, वैशाली टिपले, कोषाध्यक्ष वृषाली कडू आदींची निवड झाली. संघटक म्हणून अस्लम पठाण, सहसंघटक अनिता चिकराम, स्मीता मसे, सुजाता भगत, मंजुषा शेंडे, सविता वाघमारे, दयावंती वावरे, अल्का पुरी, योगीता डहाके, वैशाली जाधव, वनीता कडवे, विजया थूल, वैशाली ढोणे, प्रमिला वानखेडे, गिता ठाकरे, वंदना नौकरकर, कल्पना नंदनवार आणि कायदेविषयक सल्लागार म्हणून अ‍ॅड. अशोक वाघ यांची निवड झाली.(प्रतिनिधी)

Web Title: Get organized to fulfill promises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.