ग्रामीण स्त्रियांच्या उत्थानासाठी कार्यरत व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 09:54 PM2019-03-13T21:54:22+5:302019-03-13T21:54:45+5:30

आजही ग्रामीण भागातील स्त्रियांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. ग्रामस्थांची जीवनशैली सुधारावी यासाठी महात्मा गांधी खेड्यांकडे वळले. स्त्रियांच्या उत्थानासाठी सामाजिक तथा आरोग्य क्षेत्रातील संस्थांनी खेड्यामध्ये कार्यरत होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन चेतना विकासच्या संचालक व ज्येष्ठ गांधी विचारक सुमन बंग यांनी केले.

Get ready for the upliftment of rural women | ग्रामीण स्त्रियांच्या उत्थानासाठी कार्यरत व्हा

ग्रामीण स्त्रियांच्या उत्थानासाठी कार्यरत व्हा

Next
ठळक मुद्देसुमन बंग : विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा झाला सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आजही ग्रामीण भागातील स्त्रियांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. ग्रामस्थांची जीवनशैली सुधारावी यासाठी महात्मा गांधी खेड्यांकडे वळले. स्त्रियांच्या उत्थानासाठी सामाजिक तथा आरोग्य क्षेत्रातील संस्थांनी खेड्यामध्ये कार्यरत होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन चेतना विकासच्या संचालक व ज्येष्ठ गांधी विचारक सुमन बंग यांनी केले. सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठातील वुमेन्स फोरमव्दारे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
दत्ता मेघे सभागृहात आयोजित या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. राजीव बोरले, मुख्य समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, कुलसचिव डॉ. ए.जे. अंजनकर, परीक्षा नियंत्रक डॉ. मीनल चैधरी, डॉ. अलका रावेकर, वुमेन्स फोरमच्या संयोजक डॉ. प्रतिभा दवंडे यांच्या हस्ते सुमन बंग यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या सहाय्याने ९४ वर्षीय सुमन बंग यांच्या जीवन कार्याचा आलेख संजय इंगळे तिगावकर यांनी मांडला.
यावेळी प्रश्नोत्तराव्दारे त्यांच्याशी संवादही साधण्यात आला. मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे, असे वाटत असेल तर आई वडिलांनी स्वत: संस्कारित जीवनाचा अवलंब करावा, असे उदगार एका प्रश्नाच्या उत्तरा दाखल बंग यांनी काढले. बॅलन्स फॉर बेटर या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या वर्षीच्या या महिला दिन कार्यक्रमात आयुर्विज्ञान संस्थेतील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ व वर्धा टेस्ट ट्युब बेबी सेंटरच्या संचालक डॉ. दीप्ती श्रीवास्तव, अध्यापन क्षेत्रातील डॉ. उज्ज्वल गजभे, आयुवैदाचार्य डॉ. प्रज्ञा दांडेकर, उपअधिष्ठाता अख्तरबानो अहमद शेख यांच्यासह डॉ. ललित वाघमारे, सेवानिवृत्त कर्मचारी सुनील साकळे, प्रताप नानोटे, शोभा कामडी, गौरखेडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठांतर्गत कार्यरत सर्व महाविद्यालयांमधील गतवर्षातील विद्यार्थ्यांच्या स्त्री पुरुष समानता समितीने नव्या समितीचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रतिभा दवंडे यांनी केले. डॉ. श्वेता काळे पिसूळकर यांनी वुमेन्स फोरमचा वार्षिक अहवाल सादर केला. संचालन डॉ. सोफिया थॉमस आणि डॉ. नेहा जयस्वाल यांनी केले तर आभार डॉ. माधुरी वाणे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनात सहसंयोजक रुपाली सरोदे, डॉ. आशीष अंजनकर, डॉ. मीना देवगडे, डॉ. लाजवंती लालवानी, डॉ. तृप्ती वाघमारे, डॉ. शीतल महाजन, डॉ. सुवर्णा डांगोरे, डॉ. पल्लवी ठोंबरे, डॉ. अभिलाषा मिश्रा, डॉ. नीलिमा वडनेरकर, अर्चना ताकसांडे, अर्चना तेलतुंबडे, खुशबू मेश्राम, माधुरी ढोरे, वुमेन्स फोरमच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Get ready for the upliftment of rural women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.