विविधाची बत्ती गुल; नागरिकांना शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:03 PM2017-09-11T23:03:32+5:302017-09-11T23:05:17+5:30
सर्व सेवा एकाच छताखाली देण्याच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या विविधाला प्रशासनाच्या अनागोंदीचा फटका बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सर्व सेवा एकाच छताखाली देण्याच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या विविधाला प्रशासनाच्या अनागोंदीचा फटका बसत आहे. विविधात वीजबिल भरले नसल्याने शनिवारी केंद्राची वीज कापण्यात आली. याची माहितीही येथील कर्मचाºयांना नव्हती. सोमवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर देयकाचा भरणा करण्यात आली. तोपर्यंत मात्र येथे कामांकरिता आलेल्या शेतकरी व इतर नागरिकांची चांगलीच ताटकळ झाली.
वीज कापल्याचे समोर आल्यानंतर दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास देयक अदा केल्यानंतर विविधाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. यातून विविधाच्या देखभालीकरिता जिल्हाधिकारी किती गंभीर आहेत याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. सध्या शेतकºयांकडून आॅनलाईन कर्जमाफीची नोंदणी सुरू आहे. या नोंदणीकरिता शेतकरी आले असता त्यांना प्रतीक्षा करावी लागली.
या कार्यालयावर महावितरणचे सुमारे २० हजार रुपये थकले आहे. त्याचा भरणा करण्याकरिता या कार्यालयाला अनेकवार नोटीस बजावण्यात आले. मात्र त्यांच्याकडून हा प्रकार गांभीर्याने घेतला नसल्याने महावितरणने अखेर शनिवारी कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित केला. याची प्रचिती सोमवारी झाल्यानंतर देयक भरून लाईनमनला पाचारण करून विद्युत पुरवठा सुरळीत करून घेण्यात चक्क दीड तासाचा कालावधील लोटल्याने नागरिकांना अनेक त्रासाचा सामना करावा लागला.
विविधा केंद्रावर २० हजारांची थकबाकी
स्थानिक सिव्हील लाईन भागातील विविधा केंद्राला महावितरणने विद्युत जोडणी एन.एस.पी. फ्यूचरटेक ग्रामदुत या नावाने दिली आहे. सदर महावितरणच्या या ग्राहकाकडे सुमारे २० हजार रुपयाचे देयक थकलेले असल्याचे महावितरणच्या कर्मचाºयांनी सांगितले.
सहन करावा लागला उकाड्याचा त्रास
थकीत देयक अदा न करण्यात आल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना येथील कर्मचाºयांनी भारनियमनाचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले. आपला नंबर जाऊ नये म्हणून रांगेत उभे असलेल्या विद्यार्थ्यांसह वृद्ध व महिलांना उकाडा सहन करीत चक्क दीड तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागले.
एकाच मिटरवरून विविध विभागांना विद्युत पुरवठा दिला आहे. यामुळे देयकाकडे संबंधितांचे जरा दुर्लक्ष झाले. आज माहिती होताच देयकाचा भरणा तत्काळ केला.
- मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा