गिरड परिसराला गारपिटीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:17 PM2017-09-11T23:17:20+5:302017-09-11T23:17:55+5:30
सर्वत्र पावसाची प्रतीक्षा असताना रविवारी गिरडसह परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : सर्वत्र पावसाची प्रतीक्षा असताना रविवारी गिरडसह परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या गाररपिटीमुळे कपाशीचे पीक जमिनदोस्त झाल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे.
गत १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे होत्या. शेतातील उभे पीक कसे वाचवावे हिच चिंता शेतकºयांना भेडसावत असताना गिरड परिसरात रविवारी दुपारी वादळीवाºयासह पाऊस व गारपिटाने हजेरी लावली.
रविवारी गिरड, मोहगांव, आर्वी, तावी, शिवणफळ येदलाब येथे मुसळधार पाऊस झाला. या गावांमध्ये शेतातून पाणी निघाल्याने नाले तुंडुब भरून गेले. मात्र या गावां व्यतिरिक्त तालुक्यात कुठेही पाऊस पडला नसल्याचे सांगण्यात येते. वादळीवाºयासह झालेल्या पावसामुळे व गारपिटामुळे शेतकºयांचे बºयापैकी नुकसान झाले आहे. रविवारच्या पाऊस व गारपिटामुळे कपाशी, सोयाबीन व तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलीस ठाण्यातील झाड उन्मळून पडले
या वादळी वाºयामुळे अने झाडे उन्मळून पडली. यात गिरड येथील पोलीस ठाण्यातील ५० वर्षांपूर्वीचे जुने गुलमोहराचे झाड उन्मळून पडले. यासह परिसरात १० ते १५ जागची मोठमोठाली झाडे वादळामुळे पडल्याचे सांगण्यात येते. झालेल्या वादळीवाºयासह गारपिटामुळे कुठलीही जीवीत हाणी झाली नसली तरी शेतकºयांची चिंता वाढविली आहे. या पावसाने गिरड, चोरविवारा, भनगापुर, नान्ही, बोथली शिवणफळ, आर्वी या शिवारातील शेतकºयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येते.
ुदमदार पावसामुळे चिकणी (जा.) परिसरातील पिकांना संजीवनी
चिकणी (जामणी)- दिवसभर अंगाला चटके देणारे ऊन होते. परंतु, सूर्यणारायण मावळतीला जात असताना अचानक वातावरणात बदल झाला. काळ्या ढगांनी आकाशात एकच गर्दी करून परिसरात दमदार पावसाने हजेरी दिली. या भागातील शेतकºयांसह नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे परिसरातील कपाशी, तूर, सोयाबीन व विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांना संजीवनी मिळाली आहे.
विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला
सेवाग्राम- दिवसभर वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक व शेतकरी त्रस्त असताना सायंकाळी आकाशात एकच गर्दी करून विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात परिसरात पावसाच्या सरी झाल्या. पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. विविध पीकही पाण्याअभावी माना टाकत होती. पाऊस न झाल्यास जनावरांच्या चाºयासह पाण्याचा प्रश्न भेडसावेल असे बोलले जात असताना परिसरात पाऊस झाला. अजूनही या भागातील विहिरी व जलायशांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नसल्याचे वास्तव आहे. या भागातील शेतकºयांसह नागरिकांना काळ्या ढगातून जोरदार पाऊस होईल, अशी आशा आहे. इतके असले तरी सोमवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.