शेतकºयांच्या मुलींनो, नवा पर्याय उभा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 10:24 PM2017-08-28T22:24:16+5:302017-08-28T22:24:41+5:30
काल विरोधी बाकांवर असणारे व शेतकºयांना न्याय देण्याची भाषा बोलणारे लोक आज सत्ताधारी झाल्यानंतर पलटी खात असून शेतकºयांना देशद्रोही म्हणण्यापर्यंत ते गेले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : काल विरोधी बाकांवर असणारे व शेतकºयांना न्याय देण्याची भाषा बोलणारे लोक आज सत्ताधारी झाल्यानंतर पलटी खात असून शेतकºयांना देशद्रोही म्हणण्यापर्यंत ते गेले आहेत. यामुळे शेतकºयांचा प्रश्न निकाली काढायचा असेल तर आता शेतकºयांच्या मुला-मुलींनी एकत्र येत आपल्यातूनच नवे नेतृत्व उभे करीत नवा पर्याय उभारावा, असे आवाहन सुप्रसिद्ध कवी, ‘सखे साजणी’कार ज्ञानेश वाकुडकर यांनी केले.
राज्यातील शेतकºयांच्या मुला-मुलींशी संवाद साधण्यासाठी ‘युथ फॉर स्वराज्य’च्यावतीने संवाद यात्रेला आजपासून बापूकुटी येथून प्रारंभ झाला. यानिमित्त येथील प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयातील मराठी वाड.मय अभ्यास मंडळाच्या पुढाकाराने आयोजित विद्यार्थिनींशी संवाद कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. मंचावर प्राचार्य डॉ. रंभा सोनाये, मराठी विभाग प्रमुख डॉ. अनिता देशमुख, युथ फॉर स्वराज्यचे अध्यक्ष मनीषकुमार, शकिल अहमद आदी उपस्थित होते.
विविध कवितांच्या माध्यमातून मांडणी करीत वाकुडकर पूढे म्हणाले की, आपला संपूर्ण समाजच आज अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकून पडला आहे. त्याचाच फायदा घेत शेतकरीविरोधी लोक सत्तारूढ होत आहेत. हे व्हायचे नसेल तर युवक-युवतींच्या अंगात राधे माँ न येता त्यांच्या डोक्यात भगतसिंग, जिजाऊ, शिवाजी, सावित्रीबाई फुले, शाहू, आंबेडकर आले पाहिजेत. शेवटी त्यांनी शेतकºयांना आवाहन करणारी ‘जहर खाऊ नका’ व ‘बळीराजाच्या मुला रे’ या कविता सादर केल्या.
कार्यक्रमारंभी डॉ. देशमुख यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. प्रियराज महेशकर यांनी वाकुडकर यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन सीमा चव्हाण यांनी केले तर आभार प्रा. दीपक महाजन यांनी मानले. कार्यक्रमाला कवी संजय इंगळे तिगावकर, महादेव मिरगे, इस्माईल समडोळे, मनीष नोदे, दिवाकर देशमुख व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाला डॉ. मालिनी वडतकर, डॉ. सुधाकर सोनोने, डॉ. प्रतीभा ताकसांडे, डॉ. धनंजय सोनटक्के, डॉ. सोनाली वडतकर, डॉ. सुधाकर सोनोने, डॉ. प्रतीभा ताकसांडे, डॉ. धनंजय सोनटक्के, डॉ. सोनाली सिरभाते, डॉ. रेखा बोबडे, प्रा. प्रदीप दखणे, प्रा. मृणालिनी गुडधे, प्रा. अमोल घुमडे, विजय चौधरी, विनोद बावणे, दिनेश भगत, प्रमोद माथनकर, राजू मुंजेवार, नरेश आगलावे आदींनी सहकार्य केले.
शेतकºयांच्या समस्या व आत्महत्यांवर साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
सेवाग्राम - स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र व प्रेरणास्थान बापुकुटीतून प्रेरणा आणि आशीर्वाद घेऊन ‘युथ फॉर स्वराज’ सेवाग्राम ते मुंबई या यात्रेला आज प्रारंभ होत आहे. ही यात्रा बळीराजाच्या मुलांसाठी अभियान असून महाविद्यालयात जाऊन शेतकºयांच्या समस्या आणि आत्महत्या यावर संवाद साधून वास्तवातील स्वराज्य यावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी दिली.
सेवाग्राम आश्रमात ‘युथ फॉर स्वराज्य’ सेवाग्राम ते आझाद मैदान मुंबई या वाहन यात्रेला म. गांधीजींच्या आश्रमातून प्रारंभ होत असल्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्टÑीय अध्यक्ष मनीष कुमार दिल्ली, राज्य उपाध्यक्ष इस्माईल समडोळे, राज्य सरचिटणीस शकील अहमद, प्रदेश अध्यक्ष महादेव मिरगे, जिल्हाध्यक्ष मनीष नांदे, कार्यकर्ते दुर्वास पानसे, काजी, अनिल भोंगाडे, कन्हैयालाल हेमदानी, मुन्ना समडोळे, अर्जून उराडे, तुळसीराम महाकाळ, राजू आसटकर व कार्यकर्ते उपस्थित होते. वाकुडकर यांनी यावेळी कविता सादर केली. आनंद निकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वैष्णव जन तो भजन म्हटले. बापूकुटीमध्ये सर्वधर्म प्रार्थना झाली.