सिकलसेल नियंत्रणासाठी मुलींची जबाबदारी महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:37 PM2018-12-11T22:37:41+5:302018-12-11T22:38:27+5:30

आरोग्य विभाग जिल्हा परिषद, नामदेव महाराज बहुउदेशिय शिक्षण संस्था व कुंभलकर कॉलेज आॅफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १७ डिसेंबर या सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

Girls' responsibility is important for controlling sicklels | सिकलसेल नियंत्रणासाठी मुलींची जबाबदारी महत्त्वाची

सिकलसेल नियंत्रणासाठी मुलींची जबाबदारी महत्त्वाची

Next
ठळक मुद्देजयश्री गफाट : सिकलसेल नियंत्रण सप्ताहाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आरोग्य विभाग जिल्हा परिषद, नामदेव महाराज बहुउदेशिय शिक्षण संस्था व कुंभलकर कॉलेज आॅफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १७ डिसेंबर या सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आरोग्य शिक्षण व क्रीडा सभापती जयश्री गफाट उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंदु पोपटकर , जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. राज गहलोत , डॉ.राजू वाघमारे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शकीर रोकडे, उपप्राचार्य डॉ. अरविंद धोंगडे, जिल्हा सिकलसेल समन्वयक अन्नपूर्णा ढोबळे, स्मिता वासनिक , प्रा. किशोर ढोबळे , नामदेव महाराज बहुउद्देशिय शिक्षण संस्था, वर्धा यांचे सिकलसेल प्रकल्प व्यवस्थापक राजु भोंगाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.रामेश्वर व्हंडकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. राज गहलोत यांनी केले. सिकलसेल आजार काय आहे याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. डॉ. राज वाघमारे यांनी सिकलसेल आजाराचे परिणाम विद्यार्थ्यांसमोर मांडले. सभापती जयश्री गफाट यांनी सिकलसेल आजारावर मुलींची याबाबत काय जबाबदारी आहे व आपण युवा नागरिक असून समाजाच्या उध्दाराकरिता किती महत्वपूर्ण भूमिका निभावणाºया आहोत याविषयी सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. चंदू पोपटकर यांनी विद्यार्थ्यांना आपण समाजकार्याचे विद्यार्थी म्हणून या कार्यक्रमात कशी भूमिका पार पाडू शकतो व सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाला उद्देश कशाप्रकारे साध्य करू शकतो तसेच जागरूकतेची सुरूवात ही आपण आपल्यापासून करावी व समाजाला जागरूकतेचा संदेश पोहचवावा असे प्रतिपादन केले आभार प्रदर्शन अन्नपूर्णा ढोबळे यांनी केले.

Web Title: Girls' responsibility is important for controlling sicklels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य