पोरींना सन्मान मिळायलाच पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 09:58 PM2017-09-28T21:58:40+5:302017-09-28T21:58:54+5:30
प्रत्येकाच्या पायाखाली काटे येत असतात. काट्याला घाबरू नका. काट्याला वेदना नसतात. पाय घट्ट करा व पुढे वाटचाल करा. येणारा दिवस तुमचाच असेल. मी जगले आणि तुम्हीही जगा.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : प्रत्येकाच्या पायाखाली काटे येत असतात. काट्याला घाबरू नका. काट्याला वेदना नसतात. पाय घट्ट करा व पुढे वाटचाल करा. येणारा दिवस तुमचाच असेल. मी जगले आणि तुम्हीही जगा. पोरींना जपा, आपल्या संस्कृतीला जपा, मुलींना सन्मान मिळायला हवा; पण तुम्हालाही संस्कृती जपायला हवी, असे मत अनाथांची माता सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.
शहरातील टाका ग्राऊंड येथे मा राणी कला महोत्सवात त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. त्या पूढे म्हणाल्या की, वर्धा जिल्ह्यातील पिपरी (मेघे) हे माझे माहेर. चौथीपर्यंत शिक्षण झाले. २० व्या वर्षी बाळाची आई झाली. सासरशी जमेनासे झाले व मला बंड पुकारावे लागले. बाळाला घेऊन घराबाहेर पडली व पुढे भीक मागावी लागली. रेल्वे डब्यांमध्ये इतरांपेक्षा अधिक भीक मिळत असल्याने ती इतर भिकाºयांना वाटून द्यायची. यामुळे मला त्यांचे संरक्षण मिळायचे. पोटाच्या भुकेची तिव्रता एवढी होती की एकवेळ स्मशानभूमित प्रेताच्या पिठाची भाकरी बनवून तेथील अग्नीवर शिजवून खाण्याची वेळ आल्याचे त्यांनी कथन केले.
लेझिम पथकाचा नाद लक्षवेधक
सिंधुताई सपकाळ यांनी कला महोत्सवात व्याख्यान दिले. यावेळी आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले व सहकाºयांनी व्यवस्था सांभाळली. सिंधुताई यांना व्यासपीठावर आणल्यानंतर महिला समूहाच्या लेझीम पथकाने एकच नाद केला. लेझिमची सलामी त्या महिलांनी दिली. भगवा फेटा परिधान केलेल्या मराठमोळ्या वेशात तथा लेझिमच्या गजराने वातावरण भारावले. सिंधूतार्इंच्या हस्ते मान्यवर, कलावंतांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लता मोहता उपस्थित होत्या. कला महोत्सव या उपक्रमाचे सिंधुताईनी कौतुक केले.