दोन्ही सभागृहात महिलांना ३३ टक्के आरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:48 PM2017-10-31T23:48:07+5:302017-10-31T23:48:20+5:30

महिलांना विधानसभा व लोकसभेत ३३ टक्के आरक्षण देण्यात यावे यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावित अशी मागणी महिला काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

Give 33 percent reservation to women in both the houses | दोन्ही सभागृहात महिलांना ३३ टक्के आरक्षण द्या

दोन्ही सभागृहात महिलांना ३३ टक्के आरक्षण द्या

Next
ठळक मुद्देमहिला काँग्रेसची मागणी : पंतप्रधानांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महिलांना विधानसभा व लोकसभेत ३३ टक्के आरक्षण देण्यात यावे यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावित अशी मागणी महिला काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन मंगळवारी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले.
महिला या देशाचा कणा आहे. सर्वत्र महिला पुरूषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. त्या अत्यंत कुशल पद्धतीने घर घरातील प्रत्येक सदस्यांचा सांभाळ करतात. मुलावर चांगले संस्कार त्या टाकतात. महिलांच्या हातात देशाचा कारभार दिल्यास त्या देशही चांगला सांभाळू शकतात. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे कार्य इतर महिलांना पे्ररणा देणारे असून त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने महिलांच्या हितार्थ पाऊले उचलण्याची मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना अर्चना मून, नलीनी गायकवाड, जया गायधने, राजश्री देशमुख, वहिदा शेख, भारती खोंड, सोमवंशी आदी उपस्थित होते.

Web Title: Give 33 percent reservation to women in both the houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.