जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंना भारतरत्न द्या

By admin | Published: April 12, 2015 01:55 AM2015-04-12T01:55:05+5:302015-04-12T01:55:05+5:30

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंनी या देशात सामाजिक क्रांती आणि शैक्षणिक सुधारणेचा पाया घातला़ ...

Give Bharat Ratna to Jyotiba Phule and Savitribai | जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंना भारतरत्न द्या

जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंना भारतरत्न द्या

Next

वर्धा : महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंनी या देशात सामाजिक क्रांती आणि शैक्षणिक सुधारणेचा पाया घातला़ १८४८ मध्ये मुलींकरिता देशातील पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाचे बीज रोवले़ देशाच्या सर्वांगिण विकासाकरिता फुले दाम्पत्यानी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना भारतरत्न हा किताब देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना निवेदनातून केली़
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंना भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देवून सन्मान करावा, अशी संपूर्ण देशातील जनतेची मागणी आहे़ यांसदर्भात विविध संघटनांनी राज्य व केंद्र शासनाला अनेकदा निवेदन दिली़
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलास देशमुख यांनीही केंद्र शासनाला पत्र पाठवून ही मागणी केली होती़ महात्मा फुले समता परिषद आणि देशभरातील ओबीसी, आंबेडकरी, आदिवासी संघटनांनी या प्रश्नाकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले होते़ महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंनी पुरोगामी विचारांची मांडणी करून देशाला विकासाच्या प्रवाहात आणले़
शासन आणि सर्वच नेते महात्मा फुल्यांचे नाव दररोज घेतात़ त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल उतराई होण्याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात ठराव पारित करून केंद्राकडे मंजुरीकरिता पाठवा़वा, राज्यशासनाने १० एप्रिल हा संकल्पदिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले, त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबार्इंना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शिष्टमंडळात परिषदेचे विभागीय संघटक प्रा़ दिवाकर गमे परिषदेचे जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ राऊत, विजय मुळे, किशोर तितरे, अनिरूद्ध गवई, संजय भगत, सुरेश सातोकर, संजय म्हस्के, रामदास कुकडे, पुंडलिक फाटे, पवन तिजारे, जयंत भालेराव, प्रदीप महल्ले, जयंत मानकर, नामदेव गुजरकर, सुनील पाटील, देवेंद्र गावंडे आदींचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Give Bharat Ratna to Jyotiba Phule and Savitribai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.