भोई समाजास अनुसूचित जमातीच्या सवलती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:37 PM2019-01-04T22:37:25+5:302019-01-04T22:38:06+5:30
राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्यावतीने विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व पंकज बावणे, संजय दाते, प्रशांत कोल्हे, प्रकाश बावणे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्यावतीने विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व पंकज बावणे, संजय दाते, प्रशांत कोल्हे, प्रकाश बावणे यांनी केले. या आंदोलनाच्या माध्यातून भोई समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यात याव्या ही मुख्य मागणी रेटण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने भोई समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात याकरिता केंद्र सरकारकडे शिफारस करावी. भारत सरकार द्वारा गठीत दराते आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या. भटके विमुक्तांना घटनात्मक सरंक्षण देण्यात यावे. भटक्या विमुक्त जातीकरिता असलेली क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करावी. महाराष्ट्रात दुष्काळ असल्यामुळे मच्छीमार संस्थांना धरणाची ठेका रक्कम माफ करावी. जि.प. व ईरिगेशनची तलाव ठेका रक्कम पूर्ववत ३०० रुपये कायम करावे. मत्सपालनासाठी आवश्यक असलेली धरणाची पातळी दोन मिटरपर्यंत निश्चित करावी. नागपूरच्या मेट्रो रेल्वे स्टेशनला खा. जतिराम बर्वे यांचे नाव देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन आंदोलनादरम्यान संबंधितांना देण्यात आले. आंदोलनात पांडुरंग सातघरे, गजानन सातघरे, विनोद दाते, गणेश बावणे, अमोल कापटे, रामू सातघरे, लोमेश दाते, प्रशांत बावणे, सतीश दाते, पवन बावणे, किशोर सुरजुसे, दिलीप बावणे, अर्जुन पोईनकर, गजानन पोईनकर, बाबाराव कापटे, रोशन सरोकार, अभिषेक सातघरे, राहुल बावणे, कुलदीप बिरखेडे, प्रदीप दाते, रवींद्र कोल्हे, रोहित हजारे, मोनीत हजारे, रोशन हजारे, अतुल हजारे, अमोल बावणे, तानबा जोगे, बाबाराव बावणे, कोमल दाते आदी सहभागी झाले होते.
मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा
घंटानाद आंदोलनातून भोई समाज बांधवांनी सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधले. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.