शेतकऱ्यांना अनुदानावर शेतीकुंपण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 11:47 PM2019-01-06T23:47:51+5:302019-01-06T23:49:03+5:30
तालुक्यातील जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांची महाकाळी येथे बैठक पार पाडली. या बैठकीत शेतकºयांची पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घालून चर्चा करण्याचे आश्वासन माजी आमदार दादाराव केचे यांनी दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तालुक्यातील जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांची महाकाळी येथे बैठक पार पाडली. या बैठकीत शेतकºयांची पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घालून चर्चा करण्याचे आश्वासन माजी आमदार दादाराव केचे यांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी वर्ध्यात सर्व शेतकऱ्यांची पालकमंत्र्यांशी भेट घालून दिली असता शेतकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. पालकमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा करीत जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर शेती कुंपण द्या, असे आदेश जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक यांना दिले.
आर्वी तालुक्यातील बोरगाव (गोंडी), सुसुंद, हेटी, सहेली, डबलीपूर, मासोद, काचनुर, महाकाळी, दहेगाव (गोंडी) व लादगड येथील शेतकरी जंगली श्वापदामुळे त्रस्त झाले आहे. एकीकडे निसर्गाचा प्रकोप तर दुसरीकडे जंगली श्वापदांचा उपद्रव यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. शेतीची पेरणी ते काढणीपर्यंत शेतकºयांना जंगलीप्राणी सळो की पळो करुन सोडत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत पिकांना वाचविण्याकरिता चोविस तास शेतात राहावे लागते. परिणामी प्रपंच प्रभावित झाला असून परिवारीक समारंभालाही उपस्थित राहता येत नाही. मुलाबाळांनाही शेतात रखवाली करिता जावे लागत असल्याने त्यांच्याही शिक्षणावर पाणी सोडले जात आहे. कर्ज व उसणवारी पैसे घेऊन पेरलेल्या शेतात पीक वर आले की एक तर निसर्ग किंवा जंगली श्वापदामुळे नष्ट होते. त्यामुळे आता मुला-मुलींचा विवाह, आरोग्य व शिक्षणाचा खर्च क सा करावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जागली करताना शेतकºयांच्या जीवालाही धोका संभावत आहे. या विविध प्रश्नांना शेतकºयांच्या बैठकीत वाचा फोडण्यात आली. त्यामुळे माजी आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वात या सर्व शेतकºयांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकºयांनी आपली समस्या मांडत विविध मागणीचे निवेदन दिले. त्यावर पालकमंत्र्यांत्री ‘शेतकºयांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यास शासन कटिबद्ध असून महाराष्ट्र शासनाची तिजोरी सदैव शेतकºयांकरीता उघडी आहे’ असे सांगत शेतकºयांच्या सक्रीय सहभागाने शेताच्या कुंपनासहीत वन विभागामार्फत जंगल सिमांना कुंपन करण्यात येईल. तसेच ७५ टक्के अनुदानावर शेतकºयांना शेत कुंपन उपलब्ध करुन द्यावे, असे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व उप वनसंरक्षक शर्मा यांना दिले. यावेळी माजी आमदार दादाराव के चे यांच्यासह पंचायत समिती सदस्य नितीन अरबट, सहेलीचे माजी सरपंच नरेश तेलंग, विशाल सहाकारी संस्था खरांगणाचे अध्यक्ष मेघराज पेठे, लादगडचे सरपंच शिवशंकर ठाकरे, प्रविण घोळे, काचपूरचे उपसरपंच वाळेकर, बाबाराव कामळे, दहेगाव (गोंडी) चे सरपंच पुरुषोत्तम भड आणि परिसरातील शेतकºयांची उपस्थिती होती.