घोराड येथे पूर्णवेळ तलाठी द्या
By admin | Published: June 25, 2014 11:55 PM2014-06-25T23:55:57+5:302014-06-25T23:55:57+5:30
सहा हजार लोकसंख्या असलेल्या व सहा मौज्याचा समावेश असताना घोराड येथील तलाठी प्रभारी असल्याने नागरिकांची कमे होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे येथे पूर्णवेळ तलाठी द्यावा अशी मागणी
घोराड : सहा हजार लोकसंख्या असलेल्या व सहा मौज्याचा समावेश असताना घोराड येथील तलाठी प्रभारी असल्याने नागरिकांची कमे होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे येथे पूर्णवेळ तलाठी द्यावा अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांद्वारे केली हात आहे.
गत सहा महिन्याअगोदर येथील तलाठी बडे यांची बदली झाली त्यानंतर क्षीरसमुद्र येथील तलाठी घुले यांच्याकडे या कार्यालयाचा प्रभार देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात ठरविलेल्या दिवसाला तलाठी कार्यालयात कामकाज होत असताना आता जुनगड येथील तलाठी पावडे यांचेकडे घोराड तलाठी कार्यालयाचा प्रभार देण्यात आला आहे. पण काही दिवसांपासून हे कार्यालय कुलूपबंद असल्याने विविध प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या विद्यार्थी, पालक व शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
घोराड तलाठी कार्यालयांतर्गत बिबी, रिंगणी, डोरली, जरवाळा, घोराड या मौजाचा समावेश आहे. सातत्याने विविध कामासाठी येणाऱ्यांची गर्दी येथे राहत असते. या गावाला प्रभारी तलाठी असल्याने जूनगड साझा सुद्धा व्यापक आहे. येथील कार्यालय उघडण्याच्या दिवसालाही बंद राहत असल्याने या कार्यालयाला पूर्णवेळ तलाठी देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
त्याचप्रमाणे गत १५ दिवसांपासून सपूर्ण तालुक्यातील तलाठी विविधा या तहसील कार्यालयाच्या इमारतीत सात बारा, आठ(अ) संगणकीकरण व आॅनलाईन करण्याच्या कामात असल्याने तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थ्यांना आपल्या कामासाठी सेलूला यावे लागत आहे. या इमारतीत असणारी अपुरी व्यवस्था पाहता प्रमाणपत्र देताना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सध्यातरी विविधा हे तालुक्याचे तलाठी कार्यालय बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.(वार्ताहर)