अतिक्रमणधारकांना घरपट्टे द्या

By admin | Published: April 8, 2017 12:34 AM2017-04-08T00:34:28+5:302017-04-08T00:34:28+5:30

नजीकच्या सिंदी (मेघे) भागातील समतानगर येथील अतिक्रमण धारकांना तात्काळ घर पट्टे देण्यात यावे,

Give homework to encroachers | अतिक्रमणधारकांना घरपट्टे द्या

अतिक्रमणधारकांना घरपट्टे द्या

Next

आंदोलन : मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन
वर्धा : नजीकच्या सिंदी (मेघे) भागातील समतानगर येथील अतिक्रमण धारकांना तात्काळ घर पट्टे देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी शुक्रवारी स्थानिक पोस्ट आॅफिस चौक भागातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने समतानगर येथील रहिवासी सहभागी झाले होते.
निवेदनातून सिंदी (मेघे) भागातील अतिक्रमण करून राहत असलेल्या ३५ कुटुंबियांना अद्यापही जमिनीचे स्थायी पट्टे देण्यात आलेले नाही. जमिनिचे स्थायी पट्टे न देण्यात आल्याने त्यांना विविध शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. एक महिन्यांपूर्वी सदर समस्या निकाली निघावी म्हणून निवेदन देण्यात आले होते. परंतु, अद्यापही कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप करीत तात्काळ सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवदनातून करण्यात आली आहे.
सुरूवातीला निवेदन देण्यात आले त्यावेळी तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याकडून दोन ते तीन दिवसांत समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे सांगण्यात आले होेते. परंतु, नंतर विचारणा केली असता अतिक्रमण धारकांनी सादर केलेले आवश्यक कागदपत्रेच कार्यालयातून गहाळ असल्याचे तसेच नव्याने आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे सांगण्यात आले. तहसील कार्यालयातून समतानगरातील नागरिकांनी सादर केलेले कागदपत्रे गहाळ होणे ही निंदनीय बाब असल्याचा आरोप करीत याचा युवा परिवर्तन की आवाज निषेध करीत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
सदर प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच समतानगर येथील अतिक्रमण धारकांना तात्काळ जमिनीचे पट्टे देण्यासाठी शुक्रवारी स्थानिक पोस्ट आॅफिस चौकातून मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा दुपारी १ वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयावर धडकला. तहसील कार्यालयात आंदोलनकर्त्यांचे म्हणणे नायब तहसीलदार डी.एन. राऊत यांनी जाणून घेतले. तसेच त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदनही स्वीकारले. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर जोरदार नारेबाजीही केली. सकारात्क चर्चेअंती संतप्त आंदोलनकर्ते शांत झाले. आंदोलनात निहाल पांडे, पलाश उमाटे, राहुल मिश्रा, गौरव वानखेडे, हेमंत भोसले, शैलेश गिरी, धरम शेंडे, सुरज गायकवाड, साहिल नाडे, प्रतिक कामडी, अर्चना वैरागडे, वैशाली पाटील, गीता डोंगरे यांच्यासह समतानगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)

समतानगर भागातील ३५ अतिक्रमण धारकांनी आवश्यक कागदपत्रे संलग्न करून जमिनीचे स्थायी पट्टे मिळण्याबाबत तहसील कार्यालयात आवेदन सादर केले आहे. परंतु, सदर कागदपत्रेच गहाळ असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत असून तात्काळ समतानगर येथील नागरिकांना जमिनीचे स्थायी पट्टे देण्यात यावे, अशी मागणी आज आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केली. मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

Web Title: Give homework to encroachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.