भोगवटदार धारकास स्वतंत्र वीज मिटर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:55 PM2017-08-23T23:55:19+5:302017-08-23T23:55:43+5:30
वडीलोपार्जित व परंपरागत घरात राहत असताना कर्त्या पुरुषाच्या नावाने विद्युत वितरण कंपनीकडून मिटर लावून देण्यात येत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वडीलोपार्जित व परंपरागत घरात राहत असताना कर्त्या पुरुषाच्या नावाने विद्युत वितरण कंपनीकडून मिटर लावून देण्यात येत होते. परंतु आता प्रत्येक कुटूंबात वेगवेगळे लोक राहत आहे. त्यांनी आपला संसार स्वतंत्र केला आहे. अशा स्थितीत त्यांना नियमात बदल करून केवळ संमती पत्राच्या आधारावर भोगवटदार म्हणून स्वतंत्र मिटर देण्यात यावे, अशी मागणी प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका शुभांगी नरेश कोलते यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
यासंदर्भात ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी राशन कार्ड, गॅस कनेक्शन, मोबाईल/टेलीफोन बील असल्यास कुठलेही कागदपत्र न पाहता प्रत्येक भोगवटदार धारकास वेगळे मिटर कनेक्शन देण्यात यावे, असे निर्देश दिले. याप्रसंगी खा. रामदास तडस, आ. डॉ पंकज भोयर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी खा. सुरेश वाघमारे आदी उपस्थित होते.