बेरोजगार संस्थेला कामे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 09:38 PM2019-06-27T21:38:54+5:302019-06-27T21:39:11+5:30
बेरोजगार संघातर्फे राज्याचे वित्त आणि नियोजन वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच आमदार पंकज भोयर वर्धा यांना बेरोजगार संस्थेला कामे मिळावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बेरोजगार संघातर्फे राज्याचे वित्त आणि नियोजन वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच आमदार पंकज भोयर वर्धा यांना बेरोजगार संस्थेला कामे मिळावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे जि.प. येथे झालेल्या सभेत १० लाखाचे कामे विना निविदा देण्यात यावी, बेरोजगार संस्थेला दरवर्षी अनुदान मिळण्यात यावे, नगरविकास विभागातर्फे सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत किंवा शासनाच्या खाली जागेवर कमी भाडे तत्त्वावर सर्व शहरी ग्रामीण भागात १५ बाय १५ ची जागा उपलब्ध करून द्यावी, बेरोजगार संस्थेला गोटफार्म तसेच कुक्कुटपालन, गाय घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, सुधारित मार्गदर्शिका पुस्तिका तातडीने काढावी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती येथील ३ लाखांपर्यंतची कामे काम वाटप समितीतर्फे काढण्याचे आदेश काढावे, नझूल, सरकारची जागा मिळण्याबाबत तसेच बसस्थानक, उड्डाणपुलाच्या खाली जागा मिळण्याबाबत, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन ३ लाखांच्या आतील कामे, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कामे बेरोजगार संस्थेला मिळावी, असा आदेश काढण्यात यावा व ११ महिन्यांचे अद्याप देयक काढण्यात आले नाही, आदी समस्या निवेदनातून बेरोजगार सेवा सहकारी संस्थेने मांडल्या. पालकमंत्र्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत ढोबे, विशाल हजारे, महेंद्र यादव, शीला गिरी, महानंदा बनसोड, माधुरी मगर, चेतन चोरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.