ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:12 AM2018-10-22T00:12:26+5:302018-10-22T00:13:35+5:30

सेलू तालुक्यात एकमेव ग्रामीण रुग्णालयात असल्याने दररोज रुग्णांची संख्या जास्त असते. पण, येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्णांना आर्थिक भूर्दंद सोसावा लागत आहे.

 Give medical officer to the rural hospital | ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी द्या

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी द्या

Next
ठळक मुद्देc

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : सेलू तालुक्यात एकमेव ग्रामीण रुग्णालयात असल्याने दररोज रुग्णांची संख्या जास्त असते. पण, येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्णांना आर्थिक भूर्दंद सोसावा लागत आहे. त्यामुळे या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आधार संघटनेच्यावतीने जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सेलूच्या ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज दोनशेहून अधिक रुग्ण येतात. या रुग्णांची तपासणी करण्यासाठी फक्त एकमेव वैद्यकीय अधिकारी असल्याने रुग्णांना रांगेत ताटकाळत उभे राहावे लागते. विशेषत: मागील काही दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाºयांना रुग्णांच्या नातेवाईक कडून गैरवर्तवणुक मिळाली. त्यामुळे येथे वैद्यकीय अधिकारी येण्यास नकार देत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांकडून आधार संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगण्यात आले. त्यामुळेच येथील आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम होत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील रुग्णालयात दररोज वर्ध्यावरुन वैद्यकीय अधिाकरी पाठविले जातात. त्यामुळे रुग्णांनी नोंदणी केल्यानंतरही डॉक्टरची प्रतीक्षा करावी लागते. ही बाब तालुका आधार संघटनेच्या पदाधिकाºयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मडावी यांची भेट चर्चा केली. यावेळी सकाळपाळीत दोन वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी करण्यात आली. तालुक्यातील रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी, ग्रामीण रुग्णालयात तक्रार पेटी लावण्यात यावी व दर दोन दिवसांनी आलेला तक्रारीचा निपटारा करावा, यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांनी मागण्या मान्य केल्या. चर्चेला आधार संघटनेचे जतिन रणनवरे, तालुका विद्यार्थी आधार संघटनेचे अध्यक्ष सेवेंद्र विजय माहुरे, अध्यक्ष अंतिम काळे यांच्यासह आधार संघटनेचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाºयांना सहकार्य करावे त्यांच्या विषयी काही तक्रार असल्यास लेखी तक्रार करावी. येथील रुग्णालयात डॉक्टर येण्यास नकार देत आहे. त्यामुळे आपल्याला चांगली वैद्यकीय सेवा मिळत नसल्यास तक्रार करावी. पण बाचाबाची करू नये अशी विनंती आहे.
-जतिन रणनवरे, विदर्भ अध्यक्ष आधार संघटना.

सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने दिलेल्या वैद्यकीय अधिकाºयासोबत काही रुग्णांचे नातेवाईक हमरीतुमरी करत असल्याने तेथे जाण्यास डॉक्टर नकार देतात. त्यामुळे समस्या निर्माण झाली. काही तक्रार असल्यास ती माझ्याकडे करावी. आधार संघटनेनी माझ्याशी चर्चा केली. त्या संघटनेच्या काही मागण्या मान्य केल्या. तेथील रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी हा माझा प्रयत्न राहील.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा.

Web Title:  Give medical officer to the rural hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.