नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे द्या
By admin | Published: June 6, 2017 01:16 AM2017-06-06T01:16:42+5:302017-06-06T01:16:42+5:30
नाफेडने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केली आहे. परंतु, दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही...
मागणी : निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नाफेडने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केली आहे. परंतु, दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही अनेक शेतकऱ्यांना अद्यापही तुरेचे चुकारे देण्यात आले नाही. येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना पेरणी करावी लागणार असल्याने त्यांना पैशाची गरज भासणार आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचे चुकाने तात्काळ द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
नाफेडने जिल्ह्यात खरेदी केलेल्या तुरीचा आकडा मोठा आहे. आजनगाव येथील सुमेध विठ्ठल सोनपितळे, विनोद सुर्यभान भिसे यांच्यासह जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे पैसे देण्यात आलेले नाही. तुरीचा चुकाराच अद्यापही मिळाला नसल्याने यंदा बियाणे खरेदी करायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. वेळीच बियाणे खरेदीसाठी पैसे न मिळाल्यास शेतकऱ्यांना शेवटी सावकारांच्या दारात जावे लागेल. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे तुर उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना माजी जि.प. सभापती मिलिंद भेेंडे, विमल वरभे, महेश आगे, विनोद तिमांडे, गणेश वादांडे, अतुल तिमांडे, विजय तळवेकर, सुशील वडतकर, संजय अलोणे, अतुल बावणे, संदीप कलोडे, प्रमोद वरभे, दीपक तिमांडे आदींची उपस्थिती होती.