कापसाला प्रती क्विंटल सात हजार रूपये भाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:09 PM2017-11-01T23:09:03+5:302017-11-01T23:09:14+5:30
सततची नापिकी व शेतमालाला मिळणारा अल्प भाव यामुळे आदींमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : सततची नापिकी व शेतमालाला मिळणारा अल्प भाव यामुळे आदींमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या कापसाला सात हजार व सोयाबीनला पाच हजार रूपये प्रती क्विंटल भाव देण्यात यावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले यांनी कृषी अधिकाºयांना दिलेल्या निवेदतून केली आहे.
राज्यातील शेतकरी बांधवांसोबत शासन धोकेबाजीच करीत आहे. सेलू बाजार समितीत २८ आॅक्टोबरला सोयाबीन अल्पदाराने खरेदी केले. शासनाने हमीभाव ३ हजार ५० जाहीर केला आहे; पण २०० ते २ हजार रूपयांच्या फरकाने खरेदी केली जात आहे. व्यापारी सुद्धा शेतकºयांची एकप्रकारे लुटच करीत आहे. विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सरकार विरोधात शेतमालाच्या भावा संदर्भात आंदोलने केली होती. पण, आताचे भाजपा सरकार गप्प बसून असल्याचा आरोप वांदिले यांनी निवेदनातून केला आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कपाशीचे नुकसान झाले. अनेक शेतकºयांचा लागवड खर्च निघणे कठीण आहे. यामुळे कापसाला सात हजार व सोयाबीनला पाच हजार रूपये भाव देण्यात यावा. हमभावानुसार शेतमालाची खरेदी करा, कृषीपंपाचे भारनियमन त्वरित बंद करा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलमध्ये हिंगणघाट, समुद्रपूर भागातील शेतकºयांना घेऊन तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. निवेदन देताना अमोल बोरकर, सुभाष चौधरी, किशोर चांभारे, गोमाजी मोरे, लक्ष्मण सावरकर, सुधाकर वाढई, रमेश घंगारे, जयंता कातरकर, राहुल सोरटे, जगदीश वांदिले, हेमंत घोडेस, कवडू ब्राह्मणे, प्रल्हाद तुराळे, किशोर भजभुजे, अमोल मुडे, गजानन कलोडे, धनराज शंभरकर, सुनील शेंडे, आकाश डंभारे, प्रकाश भलमे, सुशील घोडे, आकाश जुमडे, सचिन वाघे आदी उपस्थित होते.