आम्हालाही धान्य द्या होऽऽ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 05:00 AM2020-04-18T05:00:00+5:302020-04-18T05:00:02+5:30
कित्येक वर्षापासून असे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे या काळात त्यांना धान्य मिळाले नाही. दत्ता गोदमने हे गेल्या १० वर्षांपासून आपल्या कुटुंबासमवेत राहतात. त्यांचे दहा जणांचे कुटुंब आहे. ते सालकऱ्याचे काम करतात. त्यांची मुले गवंडी, हमाली अशाप्रकारची रोज मजुरी करतात. आज त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : लॉकडाऊनच्या काळात सर्व जग थांबले, हाताला असलेले कामही थांबले, संघटित क्षेत्रात कार्य करणाऱ्या कामगारांना वेतन देण्याचे आदेश शासनाने दिले. परंतु, असंघटित क्षेत्र जसे शेतमजूर, छोटे व्यावसायीक, सुतारकाम, पेंटर व अशा प्रकारे काम करणाऱ्यांचे कुठलेही उत्पन्न या काळात नाही. शासनाने सर्व रेशनकार्डधारकांना धान्य देण्याचे जाहीर केले. पवनारात एकूण १,५७६ रेशन कार्डधारक असून त्यापैकी अंत्योदय योजनेचे १३० लाभार्थी आहेत. अन्नसुरक्षा योजनेत १,१२० लाभार्थी तर कृषीचे ३१० लाभार्थी आहेत. यापैकी जवळपास ९५ टक्के धान्य वाटप पूर्ण झाले. परंतु, १०९ कुटुंब असे आहे ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. त्यांनी ग्रा.पं. कडे नोंदणी केली आहे. मात्र, त्यांना धान्य देण्यास अद्याप निर्णय झालेला दिसत नाही. पवनारात अनेक कुटुंबीय कामाच्या शोधात आले व ते पवनारचे रहिवासी झाले.
कित्येक वर्षापासून असे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे या काळात त्यांना धान्य मिळाले नाही. दत्ता गोदमने हे गेल्या १० वर्षांपासून आपल्या कुटुंबासमवेत राहतात. त्यांचे दहा जणांचे कुटुंब आहे. ते सालकऱ्याचे काम करतात. त्यांची मुले गवंडी, हमाली अशाप्रकारची रोज मजुरी करतात. आज त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यांनी ग्रा.पं.कडे नावाची नोंदणी केली आहे. अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. हाताला काम नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. कार्ड नसलेल्या १०९ कुटुंबांपैकी काही कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. ग्रा.पं. स्तरावर धान्य मिळण्यासाठी नावांची यादी तहसील कार्यालयात दिली असल्याचे सरपंच शालिनी आदमने यांनी सांगितले.