विदर्भाला राज्याचा दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:46 AM2017-09-30T00:46:52+5:302017-09-30T00:46:58+5:30
जिल्हा लोकजनशक्ती पक्षाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत पाठविण्यात आले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा लोकजनशक्ती पक्षाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत पाठविण्यात आले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले.
संयुक्त महाराष्ट्रात राहुन विदर्भाची कोणतीही प्रगती झाली नाही. शेतकºयांच्या कृषीपंपाला समाधानकारक वीज पुरवठा केल्या जात नाही. येथील बेरोजगारांच्या हाताला काम नाही. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विदर्भ विकासासाठी मिळणारा निधी नेहमीच पश्चिम महाराष्ट्रावर खर्च होत आहे. त्यामुळे विदर्भाचा विकास खुंटला आहे. विदर्भात पाहिजे तसे मोठाले कारखाने नाहीत. त्यामुळे युवा पिढीला रोजगार नाही. लाखो बेरोजगार रोजगाराच्या विवंचनेत सापडले आहेत. विदर्भाचा महसूल हा विदर्भासाठी वापरला जात नसून राज्यासाठी वापरण्यात येतो. त्यामुळे विदर्भाचा विकास होत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. विदर्भाचा महसूल हा विदर्भातच खर्च झाला पाहिजे. तेव्हाच विदर्भाचा विकास होईल. विदर्भाला राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी ही रास्त असून फार पूर्वीची आहे. येथील विकासाला केंद्रस्थानी ठेऊन विदर्भ वेगळे होणे गरजेचे आहे. ही केवळ लोक जनशक्ती पार्टीची मागणी नसून संपूर्ण विदर्भातील जनतेची मागणी आहे, असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदन देताना लोकजनशक्ती पार्टीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष सतीष लोणारे, प्रदेश उपाध्यक्ष बबन तिमांडे, जिल्हाध्यक्ष सलीम काझी, जिल्हा सचिव सुरेश दौलतकर, जिल्हा मार्गदर्शक संतोष तिमांडे, अमरजित फुसाटे, संजय जोशी, प्रशांत मेश्राम, विजय नगराळे, कन्हैय्या हेमनानी, प्रमोद देवगीरकर, सुरेश चंदनकर, आदित्य दुबे, वर्षा उईके, शब्बो काझी, विना दुर्गे, राजश्री दुब्बावार, केशव तितरे, बबन दारूंडे, रूषभ सातकर आदींची उपस्थिती होती.