देव तारी त्याला कोण मारी ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:48 AM2018-07-09T00:48:55+5:302018-07-09T00:50:14+5:30

आयुष्याची दोरी जर घट्ट बांधलेली असली तर कोणतेही संकट येवो कोणीतरी देवदूत संकटमोचक बनून येतो व पुन्हा नव्याने प्राण फुंकून जातो असाच अनुभव येथे आला.येथील नेताजी वार्डातील टीकाराम मुळे (४२) हा शेतकरी पुराच्या पाण्यात अडकला होता.

God Himself kicked him .... | देव तारी त्याला कोण मारी ....

देव तारी त्याला कोण मारी ....

Next
ठळक मुद्देयुवकांनी पुरातून शेतकऱ्याला काढले बाहेर : शेतात कामासाठी गेले अन् अडकले

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : आयुष्याची दोरी जर घट्ट बांधलेली असली तर कोणतेही संकट येवो कोणीतरी देवदूत संकटमोचक बनून येतो व पुन्हा नव्याने प्राण फुंकून जातो असाच अनुभव येथे आला.येथील नेताजी वार्डातील टीकाराम मुळे (४२) हा शेतकरी पुराच्या पाण्यात अडकला होता. पाणी वाढल्याने तब्बल चार तास तो झाडावर थांबून राहिला अखेरीस पुराच्या वेढ्यातून त्याला स्थानिक युवकांनी सुखरूप बाहेर काढले.
येथून ५ कि.मी.अंतरावरील शहालगडी देवस्थानच्या मागे असलेल्या जुनोना शिवारात शनिवारी शेतात काम करण्यासाठी टीकाराम मुळे निघून गेले होते. दिवसभर काम करीत असताना कामाच्या धावपळीत आजूबाजूचा परिसर पुराच्या पाण्याने भरला हे त्याच्या लक्षात आले नाही. ज्यावेळी त्याचे लक्ष्य गेले तेव्हा बाहेर जाणारे रस्ते पुरामुळे बंद झाले होते.अन वेगाने पुराचे पाणी वाढत होते. पहाता पहाता टीकाराम असलेला पूर्ण परिसर पाण्यात वेढला गेला.जीव वाचविण्यासाठी त्यांनी बाजूला असलेल्या झाडाचा आश्रय घेतला. मदतीसाठी जीवाच्या आकांताने ते ओरडत होते. दूरवरच्या एका शेतकºयांला झाडावर बसलेला टीकाराम दिसला. त्याने टीकारामच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला यांची माहिती दिली. पत्नीने तत्काळ तहसील कार्यालय गाठून तहसीलदार सचिन यादव यांना माहिती दिली.
त्यांनी पोलिसांना सूचना दिली त्यानंतर ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी तातडीने आपली चमू तयार केली. २० ते २५ पोलिसांचे पथक जीवनरक्षक साहित्यासह रवाना झाले.त्याचवेळी देवा जोशी, सूरज काटकर, अशोक मोरे व न प सदस्य धंनजय बकाने हे घटनास्थळी पोहचले. रात्रीचा किर्रर काळोखं,पुराचं वाढतं पाणी ,आणि सर्वत्र अंधारच साम्राज्य अशा बिकट परिस्थितीत त्याला सुखरूप परत आणणे हे प्रचंड आव्हान होतं. परंतु हे आव्हान स्वीकारलं चार युवकांनी. त्या काळोख्या रात्री त्या चौघांनीही भर नदीच्या पुरात उड्या घेतल्या.पोहत त्या झाडापर्यत पोहचले. दोराच्या सहाय्याने टीकारामला १५ फूट झाडावरून खाली उतरविले.त्या अंधाºया रात्री ट्यूबच्या सहाय्याने चौघांनी त्याला सुखरूप काठावर आणले.
या युवकांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. समुद्रपूर , हिंगणघाट तालुक्याला पावसाने जबर तडाखा दिला.अनेक लोक पुरात अडकले होते त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सुखरूप बाहेर काढले.

Web Title: God Himself kicked him ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.