गांधी आश्रमात पारंपरिक पद्धतीने झाले गोधनाचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2021 05:00 AM2021-11-06T05:00:00+5:302021-11-06T05:00:07+5:30
सेवाग्राम येथील जुन्या वस्तीत गोवर्धन पूजनाचा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे पूर्वी या परिसरात मोठ्या संख्येने गोवंश होते. पण यंदाच्या वर्षी मोजक्याच पशुपालकांकडे गोवंश असल्याचे दिसून आले. शंकर कुमरे, सुभाष नेहारे आणि नामदेव मडावी यांनी पारंपरिक पद्धतीने आकर्षक सजविण्यात आलेल्या गाईंची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. गावातील मंदिरात विधिवत पूजा करून मेडिकल चौकातील मंदिरात अखेरचे पूजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : येथील गांधी आश्रमात आश्रम प्रतिष्ठानच्या गोशाळा विभागाच्या वतीने दिवाळी पाडवा तसेच बलिप्रतिपदाचे औचित्य साधून गोधनाचे पूजन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.
आकर्षक सजविण्यात आलेल्या गोवंशांना पुरणाचा नैवेद्य दाखविण्यात आला. इतकेच नव्हे तर या प्रसंगी सादर करण्यात आलेल्या एकापेक्षा भजनांसह गाण्यांमुळे उत्सवातील उत्साह द्विगुणित झाला होता.
कार्यक्रमादरम्यान अमृताहूनी गोड, है प्रार्थना गुरू देव की, अबीर गुलाल उधळीत रंग, चल चल आपल्या गावाला राहू नको तू शहराला, आदी बहारदार गाणी सादर करण्यात आली. गायकांना शंकर शेंद्रे, जालंधरनाथ, नीलेश आळणकर, सुधाकर शेंडे, नामदेव ढोले, ओम गुरुनुले, बाबा खैरकर, गजानन गुरनुले आदींनी साथसंगत दिली.
विजय धुमाळे यांनी आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाला शोभा कवाडकर, सदा मून, सुनीता परचाके, सावित्री सनत, रवी गोंळकर, मारुती गुरनुले, संगीता चव्हाण, अश्विनी बघेल, प्रभा शहाणे, माधुरी चांभारे, जयश्री पाटील, डॉ. शिवचरण ठाकुर, सचिन हुडे, आकाश लोखंडे, सचिन बहादुरे, शंकर वाणी, जानराव खैरकर, सुधाकर खानझोडे, नामदेव बघेकर, सुधाकर काळे, सुनील फोकमारे, सपना कार्डेकर, राणी मून, शर्मिला लोखंडे, संजय आत्राम, सुभाष ताकसांडे आदींची उपस्थिती होती.
जुन्या वस्तीत घटली गोवंशांची संख्या
- सेवाग्राम येथील जुन्या वस्तीत गोवर्धन पूजनाचा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे पूर्वी या परिसरात मोठ्या संख्येने गोवंश होते. पण यंदाच्या वर्षी मोजक्याच पशुपालकांकडे गोवंश असल्याचे दिसून आले. शंकर कुमरे, सुभाष नेहारे आणि नामदेव मडावी यांनी पारंपरिक पद्धतीने आकर्षक सजविण्यात आलेल्या गाईंची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. गावातील मंदिरात विधिवत पूजा करून मेडिकल चौकातील मंदिरात अखेरचे पूजन करण्यात आले. असे असले तरी सेवाग्राम जुन्या वस्तीत गोवंशांची संख्या बऱ्यापैकी घटल्याचे दिसले.