रस्त्याच्या बांधकामात गौडबंगाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 09:59 PM2018-11-05T21:59:01+5:302018-11-05T21:59:16+5:30
येथील रामनगर वॉर्डात न.प.च्या देखरेखीत तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामात कंत्राटदार मनमर्जी करीत असल्याने शासनाचा निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील रामनगर वॉर्डात न.प.च्या देखरेखीत तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामात कंत्राटदार मनमर्जी करीत असल्याने शासनाचा निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सिमेंट रस्त्याच्या कामासाठी झालेली काम दर्जाहीन असल्याने कंत्राटदार देखरेखीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना अंधारात तर ठेवत नाही ना, अशी चर्चा परिसरात होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी आहे.
रामनगर वॉर्डात सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. हे विकास काम स्थानिक न.प.च्या देखरेखीत होत आहे. या रस्त्याच्या बांधकामाचा ठेका देण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून शासनाच्या नियमांना बगद देत मनमर्जीने काम केले जात आहे. त्याकडे पालिकेतील अभियंत्यांचेही दुर्लक्ष होत आहे. हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असून त्यासाठी शासनाचा मोठा निधीही प्राप्त झाला आहे. परंतु, दर्जाहीन काम झाल्यास अल्पावधीतच रस्त्याची दैनावस्था होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. सिमेंट रस्त्याच्या बांधकामादरम्यान चांगल्या गुणवत्तेचे सिमेंट, रेती व सळाखींचा वापर होणे गरजेचे आहे. परंतु, येथे रेती ऐवजी माती सारखी चुरीचा वापर केल्या जात आहे. त्याबाबत काही सुजान नागरिकांकडून विचारणा करण्यात आली असता उडवा-उडवीचे उत्तरे देऊन वेळ काढू धोरण अवलंबिण्यात आले. इतकेच नव्हे तर पालिकेच्या अभियंत्यांना विचारा करण्यात आली असता रेती उपलब्ध नसल्याने चुरीचा वापर होत असल्याचे त्यांनी काही सुजान नागरिकांना सांगितले. त्यांच्याकडून देण्यात आलेली ही माहिती अप्रत्यक्ष भ्रष्टाचाराला खतपाणी देणारेच असल्याचा आरोप उपविभागीय महसलू अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. निवेदन देताना विकी वाघमारे, अमर बन्सोड, अमर बकाने, अमोल जगताप, अॅड. संजय जामुनकर, आशीष खेडकर, तेजस डेपे, अभय दारोंडे, कुणाल जांभुळकर, हर्षल बोरकर, सुरज गावंडे, जयपाल तामगाडगे, कुणाल जाभुंळकर, नितेश वावरे, झिलटे आदी हजर होते.