सायकलसाठी शासकीय दरबारी हेमंतच्या चकरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 10:31 PM2018-05-14T22:31:48+5:302018-05-14T22:32:06+5:30

शासनाने दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे याकरिता अर्थसहाय्य देणाऱ्या अनेक योजना कार्यान्वीत केल्या आहेत. या योजना असतानाही दिव्यांगाना त्याचा कवडीचाही लाभ होत नसल्याचे वर्धेत दिसत आहे.

Government Court for cycling Hemant Chakra | सायकलसाठी शासकीय दरबारी हेमंतच्या चकरा

सायकलसाठी शासकीय दरबारी हेमंतच्या चकरा

googlenewsNext
ठळक मुद्देदिव्यांगाची हेळसांड : पोटाची खळगी भरण्यासाठी शिवतो चपला-जोडे

सचिन देवतळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : शासनाने दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे याकरिता अर्थसहाय्य देणाऱ्या अनेक योजना कार्यान्वीत केल्या आहेत. या योजना असतानाही दिव्यांगाना त्याचा कवडीचाही लाभ होत नसल्याचे वर्धेत दिसत आहे. याच शासकीय योजनेतून एक तीनइ चाकी सायकल मिळावी याकरिता रसुलाबाद येथील दिव्यांग हेमंत शेगोकार शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. पण त्याला कोणाकडूनही मदत मिळत नसल्याचे विदारक वास्तव आहे.
हेमंतला वृद्ध आई सतत आजारी असलेली पत्नी व दोन चिमुकली मुलं असा संसाराचा गाढा रेटायचा आहे. संसाराचा हा गाडा चालविण्याकरिता हेमंत हा रोज २० की.मी.चा प्रवास करून तीनचाकी सायकल वर गावोगावी फीरुन चपला व जोडे शिवतो. यातुन मिळणाºया पैशातुन त्याचा उदरनिर्वाह चालतो. वृद्ध आईचा व आजारी असलेल्या पत्नीचा औषधाचा खर्च मुलांचे शिक्षण व पोटाची आग या कमाईतुन तो विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. तीन चाकी सायकलवर तो आपले दुकान थाटुन गावोगावी चपला जोडे शिवायचा धंदा करतो. १५ वर्षांपासून त्याचा हा व्यवसाय सुरू आहे. सध्या त्याच्याकडे असलेल्या सायकलची खस्ता हाल झाल्याने त्याला या सायकलवरून प्रवास करणे कठीण झाले आहे. ही सायकल चालविताना त्याला थकवा येतो. यातून चक्कर आल्याने अनेक वेळा तो चक्कर येवून पडल्याचे प्रकार घडले आहेत. याचा त्याच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होवून त्याच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी तो बँटरीवरची सायकल मिळावी म्हणून त्याने दोन वर्षांपूर्वी शासकीय दप्तरी अर्ज केला; परंतु दोन वर्षांपासून अजुनही त्याला बँटरीवर चालणारी सायकल मिळालीच नाही. या मागणीकरिता तो दोन वर्षांपासून शासकीय दप्तरी चकरा मारतो आहे. आमदार खासदारांनाही तो भेटला. पण त्याला कुणाकडूनच मदत मिळाली नाही.
जन्मत:च दोन्ही पायांनी अधू असलेल्या हेमंतला चालताच येत नाही. इतरांच्या मदतीने दिवसभराच्या क्रीया पार पाडाव्या लागतात. कुणाची मदत भेटली तर ठीक नाही तर त्याच जागेवर पडुन राहावे लागते. एखाद्या परक्या व्यक्तीला तो सायकलवर बसून मागतो. चक्क २० किमी अंतर काूपन तो संसाराचा गाडा ओढतो. राहायला पडके घर आहे. शासनाच्या योजनेतून नवे घर मिळावे याकरिताही त्याचा संघर्ष सुरूच आहे.
हेमंतची अवस्था पाहिल्यावर दिव्यांगाकरिता असलेल्या शासनाच्या योजना कदाचित त्याच्याकरिता नसाव्या असाच प्रयत्य येतो. यामुळे शासनाच्या अधिकाºयांनी गावातील लोकप्रतिनिधींनी हेमंतच्या वेदाना समजून त्याला मदत करून शासनाच्या योजनाचा लाभ मिळवून देण्याकरिता कार्य करण्याची गरज आहे.
घरकुलासाठीही धावपळ
प्रत्येकाना हक्काचे घर मिळावे याकरिता शासनाच्यावतीने पंतप्रधान घरकुलन योजना अंमलात आणली. या योजनेत दारिद्र्य रेषेखाली असलेल्या व्यक्तीला घर देण्याकरिता शासन अनुदानही देत आहे. सर्वच निकषात बसत असलेल्या हेमंतला मात्र या घरकुलाकरिता संघर्ष करावा लागत असल्याचे दिसते.

Web Title: Government Court for cycling Hemant Chakra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.