शासकीय चना व तूर होतेय खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:13 AM2018-09-05T00:13:07+5:302018-09-05T00:13:48+5:30

समाधानकारक भाव मिळत असल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी नाफेडला आपला शेतमाल विकला. ठिकठिकाणी तूर, चना व सोयाबीनची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली. असे असले तरी सध्या नियोजनशुन्य कारभारामुळे येथील नाफेडच्या केंद्रातील ६१ पोते तूर व २ हजार ७६ पोते चना जागेवरच खराब होत आहे.

Government gram is poor and poor | शासकीय चना व तूर होतेय खराब

शासकीय चना व तूर होतेय खराब

Next
ठळक मुद्देनाफेडचा नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : समाधानकारक भाव मिळत असल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी नाफेडला आपला शेतमाल विकला. ठिकठिकाणी तूर, चना व सोयाबीनची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली. असे असले तरी सध्या नियोजनशुन्य कारभारामुळे येथील नाफेडच्या केंद्रातील ६१ पोते तूर व २ हजार ७६ पोते चना जागेवरच खराब होत आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्हा मार्केटींग फेडरेशनमार्फत समुद्रपूर येथील तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेचे सब एजंट नेमुन सन २०१७-१८ या हंगामात शासनाच्या ग्रेडरच्यवतीने १३८४१.८६ क्विंटल तूर आणि ४३८२.६८ क्विंटल चना खरेदी करण्यात आला आहे. खरेदी केलेल्या शेतमालाची साठवणूक करण्यासाठी योग्य सोयी-सुविधा करण्यात आली नाही. त्यामुळे या केंद्रातील ६१ पोते तूर व २ हजार ७६ पोते चना पावसामुळे भिजून खराब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाने वर्धा जिल्हा मार्केटींग कार्यालयाला एका लेखी पत्राद्वारे शिल्लक असलेला चना व तूर तात्काळ उचलावा, अन्यथा त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाची राहील. शिवाय खरेदी-विक्री संघाचे सन २०१३-१४ पासून ते सन २०१७-१८ पर्यंतचे अनुषागिक खर्च आणि सब एजंट कमीशन ३४ लाख ७८ हजार ३८२ रुपये तसेच वाहतूक भाडे, सन २०१६-१७ चे तूर खरेदीतले ५ शेतकऱ्यांचे सुमारे ४० लाख रुपये देण्याच्या सूचनाही देण्यात आले आहे. पण त्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याने येथील अडचणी आणखीच वाढल्या आहेत.
शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीची स्थिती
शासनाने सोयाबीन, तूर व चना मोठ्या प्रमाणात खरेदी केला आहे. सन २०१६-१७ मध्ये ३ हजार २०० शेतकºयांकडून २२ हजार १११ क्विंटल तूर, सन २०१७-१८ या हंगामात शासनाने दिलेल्या ग्रेडर मार्फत १७ फेब्रुवारी २०१८ ते १५ मे २०१८ दरम्यान १ हजार १३३ शेतकºयांकडून १३ हजार ४८१.८६ क्विंटल तूर आणि ११ मे २०१८ ते २९ मे २०१८ पर्यंत २६१ शेतकºयांकडून ४ हजार ३८२.६८ क्विंटल चना खरेदी केला आहे.
पावसामुळे जागेवरच सडली तूर
नाफेडने खरेदी केलेल्या तुरीच्या ढिगाला पाणी लागल्याने तूर जागेवरच सडली आहे. यामुळे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज असून याकडे लक्ष देत सदर शेतमालाची उचल करण्याची मागणी आहे.

समुद्रपूर खरेदी-विक्री संघाच्यावतीने नाफेडने तूर व चना खरेदी केला. मात्र, साठवलेला माल नाफेडने उचल न केल्यामुळे शेतकºयांचा शेतमाल खराब होत आहे. शिवाय संस्थेचेही देणे थकले आहे. नाफेडने खरेदी केलेल्या मालाची त्वरीत उचल करुन ख.वि.स.ची थकीत रक्कम तात्काळ द्यावी.
- मोतिराम जीवतोडे, व्यवस्थापक, ख.वि.स. समुद्रपूर.

Web Title: Government gram is poor and poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.