शहीदाच्या परिवारास शासकीय मदत
By admin | Published: March 26, 2017 01:08 AM2017-03-26T01:08:41+5:302017-03-26T01:08:41+5:30
छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे माओवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या तुकडीवर हल्ला केला. याम ११ जवान शहीद झाले.
परिवारातील सदस्यांसह अधिकाऱ्यांची हजेरी
पुलगाव : छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे माओवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या तुकडीवर हल्ला केला. याम ११ जवान शहीद झाले. त्यात पुलगाव येथील प्रेमदास मेंढे या जवानाचा समावेश होता. शहीदाच्या कुटुंबाला शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतीचा दहा लाख रुपयांचा धनादेश शनिवारी खा. रामदास तडस व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्यांच्या सुपूर्द केला.
शासन शहीदाच्या परिवारास आर्थिक मदत देते, पण त्यांचा जीव मात्र परत आणू शकत नाही. अवाढव्य सेना असलेले शासन राजकीय किंवा कुठल्यातरी दडपणाखाली तर मुठभर अतिरेक्यांना भीत तर नाही ना, असा संतप्त सवाल वीर पत्नी हर्षदा व परिवाराने केला.
यावेळी तहसीलदार तेजस्विनी जाधव यांचीही उपस्थिती होती. मदत देण्यापूर्वी या खासदारांनी शहीद प्रेमदास मेंढे यांच्या प्रतिमेला पुष्पवाहुन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी खासदारांनी या कुटुंबाचे सात्वन केले. तर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाची भुमिका विषद केली. यावेळी शहीद मेढे यांची मुलगी गुंजन आणि मुलगा आर्यन यांच्यासह न.प. उपाध्यक्ष आशिष गांधी, जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, पं.स. उपसभापती किशोर गव्हाळकर, दीपक फुलकरी, सुभाष पेठकर, नितीन बडगे, नंदू वैद्य, प्रभाकर शहाकार, बहादुर चौधरी, सावरिया मारोटीया, प्रेम साहू, विशाल धोपाडे, अशोक सुखिजा, मधुकर रेवतकर यांच्यासह मोठ्या संख्येने मंडळी उपस्थित होती.(तालुका प्रतिनिधी)