सुटीच्या दिवशीही शासकीय कार्यालय उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:18 PM2018-03-25T22:18:23+5:302018-03-25T22:18:23+5:30

मार्च.. आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना. या आर्थिक वर्षांत झालेल्या विविध शासकीय कामांचा आढावा याच महिन्याच्या अखेरीस घेतला जातो.

The government office is open on the holidays | सुटीच्या दिवशीही शासकीय कार्यालय उघडे

सुटीच्या दिवशीही शासकीय कार्यालय उघडे

Next
ठळक मुद्देमार्च एन्डींगचे वर्कलोड

आॅनलाईन लोकमत
वर्धा : मार्च.. आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना. या आर्थिक वर्षांत झालेल्या विविध शासकीय कामांचा आढावा याच महिन्याच्या अखेरीस घेतला जातो. सर्वच योजनांच्या अंमलबजावणीसाठी आलेल्या निधीचा हिशेब अन् आकडेवारी जोडण्याची जबाबदारी संबंधित काम करणाऱ्या त्या कर्मचाºयाची आहे. याच आकड्यांचा मेळ घालण्याकरिता रविवारी सुटीच्या दिवशीही शासकीय कार्यालयात कर्मचाºयांची गर्दी असल्याचे दिसून आले.
आज रविवार आणि रामनवमी असल्यामुळे सुटी होती. असे असताना जिल्हा परिषद इमारतीत अनेक विभागाचे कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून आले. या कर्मचाºयांकडून पेन्डींग कामे करण्यात येत असल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेचा वित्त विभाग आणि समाजकल्याण विभागात कर्मचाºयांची चांगलीच रेलचेल दिसून आली. वर्षभर केलेली कामे शासनाने दिलेल्या निकषात बसविण्याकरिता कर्मचारी प्रयत्नरत आहेत. या कामाचे एकाच वेळी लोड येणार नाही, याची खबरदारी घेण्याकरिता कर्मचाºयांकडून ही लगबग असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागातील नागरिकांकरिता विशेष योजना राबविण्यात येतात. याकरिता कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यात अधिकाºयांकडून एका विषयाचा निधी दुसºया विषयात खर्च करण्यात येतो. त्याची तडजोड करण्याची जबाबदारी सदर काम सांभाळणाºया कर्मचाºयावर येते. यात अधिकाºयांना विश्वासात घेत त्यांच्या सांगण्यानुसार आकड्यांचा मेळ घालण्याचे काम या कर्मचाºयामार्फत करण्यात येते. या आकड्यांचा मेळ घालण्याकरिता या कर्मचाºयांकडून सुटीच्या दिवशीही कामे होत असल्याचे दिसत आहे.

अनेक विभागात अधिकाºयांचे झोल
शासकीय योजना राबविताना काही अधिकाºयांकडून मोठ-मोठे झोल करण्यात येतात. यात कर्मचाºयांनाही लाभ होतो. अधिकाºयांकडून करण्यात आलेला हा झोल मिटविण्याकरिता कागदावरचा हिशेब चोख ठेवण्याकरिता जिल्हा परिषदेचे कर्मचारी रात्रीही काम करताना दिसून आले आहे. शासनाचा हिशेब जोडण्याकरिता सुटीचा दिवस असो वा रात्र ३१ मार्चपुर्वी टार्गेट पूर्ण करण्याचे कर्मचाºयांकडून प्रयत्न होत असल्याचे दिसते.

काही कार्यालयात रात्रीलाही धावपळ
मार्च महिन्याच्या अखेरीस सर्वच हिशेब चोख राहावे याकरिता कर्मचाºयांची रात्रीलाही शासकीही कार्यालयात धावपळ असल्याचे दिसून येते. या कर्मचाºयांकडून रातोरात जुना हिशेब पूर्ण करून त्याची नव्या निधीशी सांगड घालण्याची किमयाही साधल्या जाते.

Web Title: The government office is open on the holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.