शासकीय नोंदीतून जागाच झाली गायब

By admin | Published: January 15, 2017 12:54 AM2017-01-15T00:54:16+5:302017-01-15T00:54:16+5:30

सुकळी (उबार) ग्रामपंचायतच्या मकान कर आकारणी नकलेत इसमाच्या हक्काची असलेली जागा नोंदीतून बाद करण्यात आली आहे.

The government records have disappeared from the place | शासकीय नोंदीतून जागाच झाली गायब

शासकीय नोंदीतून जागाच झाली गायब

Next

माहिती अधिकारात प्रकार उघडकीस
वर्धा : सुकळी (उबार) ग्रामपंचायतच्या मकान कर आकारणी नकलेत इसमाच्या हक्काची असलेली जागा नोंदीतून बाद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अधिकारात ग्रामपंचायतकडे माहिती मागविली असता सदर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही नोंद पूर्ववत करण्याचे आदेश ग्रामपंचायतला देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन शरद भोयर यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी आणि गटविकास अधिकारी, वर्धा पं.स. यांना दिले आहे. याबाबत वृत्त असे की शरद भोयर, यांची ४०६१ चौ. फु. जागा २०१०-११ च्या मकान कर आकारणी नकलेत दर्शविण्यात आली आहे. मात्र २०११-१२ च्या नकलेत ती जागा गायब असल्याने व्यथित होवून भोयर यांनी ग्रामपंचायतकडे माहिती अधिकारात अर्ज केला. या अर्जातून मिळालेल्या माहितीत ४०६१ चौ.फु. जागा दर्शविण्यात आलेली नसल्याची बाब उघडकीस आली. नोंदीतून ४०६१ चौ.फु. जागा परस्पर बेपत्ता कशी झाली याबाबत संभ्रम आहे. ही नेमकी गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही जागा अन्य नोंदीत जोडण्यात आल्यास जागेच्या मालकाला यापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ही चूक दुरूस्त करण्याचे आदेश देवून न्याय देण्याची मागणी भोयर यांनी केली आहे. याबाबत कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The government records have disappeared from the place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.