शासनाने नर्सिंग अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती सुरू करावी
By admin | Published: January 5, 2017 12:38 AM2017-01-05T00:38:55+5:302017-01-05T00:38:55+5:30
ए.एन.एम., जी.एन.एम. हा अभ्यासक्रम १०० टक्के रोजगार देणारा आहे. या अभ्यासक्रमाला आर्थिक दुर्बल घटकातील
विदर्भ ओबीसी कृती समितीची मागणी : प्रशासनाला निवेदन
वर्धा : ए.एन.एम., जी.एन.एम. हा अभ्यासक्रम १०० टक्के रोजगार देणारा आहे. या अभ्यासक्रमाला आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनी अधिक प्रमाणात प्रवेश घेतात. मात्र फी भरणे शक्य नसल्याने यातील बहुतांश विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यात व्यत्यय येतो. या अभ्यासक्रमाला शिष्यवृत्ती सुरू करावी, अशी मागणी ओबीसी शिष्यवृत्ती कृती समितीने केली आहे.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी गरीब कुट्ुंबातील, काही विधवा, परितक्ता किंवा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातून असतात. त्यांना अभ्यासक्रमाची फी भरणे शक्य होत नसल्याने रोजगार देणाऱ्या अभ्यासक्रमापासून वंचित राहावे लागते. या अभ्यासक्रकरिता केंद्रशासनाची शिष्यवृत्ती योजना लागू करावी. जेणेकरुन विद्यार्थिनी आत्मनिर्भर होईल, अशी मागणी विदर्भ ओबीसी शिष्यवृत्ती कृती समितीने केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)