सरकारने शेतकऱ्यांशी द्रोह केला- सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 09:41 PM2017-12-06T21:41:07+5:302017-12-06T21:42:28+5:30

वर्धा - शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांशीच द्रोह केला असून, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सेवाग्राम येथे झालेल्या सभेत मांडली.

Government sprayed farmers - Sunil Tatkare | सरकारने शेतकऱ्यांशी द्रोह केला- सुनील तटकरे

सरकारने शेतकऱ्यांशी द्रोह केला- सुनील तटकरे

Next

वर्धा - शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांशीच द्रोह केला असून, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सेवाग्राम येथे झालेल्या सभेत मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल पदयात्रा सहाव्या दिवशी सेवाग्राम चौक येथे झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या सडेतोड भाषणात खोटी आश्वासने देत हे खोटारडे सरकार आमच्या आया-बहिणींचं कुंकू पुसत आहे. यवतमाळ फवारणी करताना शेतकऱ्यांचा बळी गेला.आया-बहिणींची कुंकू पुसली जात असल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विदर्भाची भूमी सरकारवर हल्लाबोल करायला निवडली आहे.

या हल्लाबोलचा समारोप १२ डिसेंबरला करून आम्ही थांबणार नाही, तर त्यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारच्याविरोधात रस्त्यावर उतरून लढा सुरूच ठेवणार आहे.सरकारचा खोटरडेपणा जनतेसमोर प्रभावीपणे मांडणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.
यावेळी मोबाईलचे प्लॅशलाईट पेटवून भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. या सभेला खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सुरेश देशमुख,माजी आमदार संदीप बजोरिया,माजी आमदार गुलाबराव गावंडे,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, प्रवक्ते महेश तपासे आदींसह राज्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, युवती, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Government sprayed farmers - Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.