जुनी पेन्शनसाठी शासनाला गाजराचा हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:21 AM2019-01-30T00:21:30+5:302019-01-30T00:22:44+5:30
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गाजराचा हार घालून निषेध नोंदविला. कायमच असंवेदनशील व भांडवलशाही सरकारच्या विरोधात जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने राज्यभर हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गाजराचा हार घालून निषेध नोंदविला.
कायमच असंवेदनशील व भांडवलशाही सरकारच्या विरोधात जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने राज्यभर हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने वर्ध्यातही झालेल्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना, कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. संघटनेने यापूर्वी अनेक मोर्चे, मुंडन आंदोलन, धरणे इत्यादी कार्यक्रम राबवून सरकारचे लक्ष वेधले. परंतु सरकारने अभ्यासगटाच्या नावाखाली केवळ निराशा केली. त्यामुळे संघटनेने निर्णायक आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी नियोजनबध्द कार्यसूची ठरवून आंदोलनाची व्याप्ती व तीव्रता वाढविणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. केंद्राच्या अंशदान पेन्शन योजनेत कुटूंब वेतन हा पर्याय लागू असतांना राज्य शासनाने दुजाभाव दाखवित योजनेत मय्यत कुटूंबाच्या व्यक्तीना कुठलाही आर्थिक लाभ दिला नसल्याने कर्मचाऱ्यांत असंतोष पसरत आहे. वर्धेतील आंदोलनाला विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले होते. उपस्थित सर्व डीसीपीएस कर्मचाºयांसमोर आपल्या पक्षाची जुन्या पेन्शनबाबत भुमिका मांडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर देशमुख, आम आदमी पक्षाचे प्रमोद भोमले यांची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, प्रमोद खोंडे, मंगेश भोमले, रितेश निमसडे, सागर मसराम, राजेश कापसे, आषिश बोटरे, योगेश फिरंगे, पंडीत, विनोद वाडीभस्मे, सुरज वैद्य, सचिन शंभरकर, सुशिल गायकवाड, हेमंत पारधी, कृष्णा तिमासे, मोईन शेख, अमोल पोले यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित झाले होते.