शासनाची तंबाखूबंदी ही केवळ कागदावरच

By admin | Published: May 31, 2015 01:35 AM2015-05-31T01:35:08+5:302015-05-31T01:35:08+5:30

शासनाने तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर कायद्याने बंदी घातली. त्यानुसार तंबाखूजन्य पदार्थांच्या पुरवठ्यावर २००३ पासून निर्बंध असले तरी ..

The Government's Tobacco Loan is only on paper | शासनाची तंबाखूबंदी ही केवळ कागदावरच

शासनाची तंबाखूबंदी ही केवळ कागदावरच

Next

वर्धा : शासनाने तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर कायद्याने बंदी घातली. त्यानुसार तंबाखूजन्य पदार्थांच्या पुरवठ्यावर २००३ पासून निर्बंध असले तरी या पदार्थ्यांचा छुप्या मार्गाने सर्रास वापर सुरू असल्याचे दिसते. शाळा महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकले जात असल्याने आजची पिढी या व्यसनाला बळी पडत असल्याचे तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या मृत्यूमुळे स्पष्ट होते. कायदा असला तरी त्याची अंबलबाजावणी शून्य असल्याचे दिसते.
कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नियमांचे पालन करण्यात तोकडी ठरत असल्याचे वास्तव्य आहे. वर्धा शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यावरही गुटखापुडी व तंबाखू पुडीचा खच पहायला मिळतो. यावरून नियमाचे पालन काटेकोरपणे होत आहे काय, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. सार्वजनिक स्थळी तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन हा दंडनीय अपराध असला तरी सार्वजनिक स्थळांवर या नियमांचा भंग होत असल्याचा प्रत्यय असल्याने कायद्याची अंमलबजावणी गरजेची आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
महिला आरोग्य अभियानात मुखकर्करोगाचे ८८ संशयित रुग्ण
जगात धूम्रपान केल्याने ३० लाख मृत्यू संभवतात. विकसीत देशात कर्करोगाने होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी ३० टक्के मृत्यू तंबाखू सेवनाशी निगडीत आहेत. भारतात दरवर्षी धूम्रपानामुळे ९ लाख लोक मृत्यूमुखी पडतात. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या महिला आरोग्य अभियानात मुख कर्करोगाकरिता ९ हजार ३१० महिलांची तपासणी केली असता ८८ महिला संशयित आढळून आल्या. जगातील एकूण धूम्रपानप्रेमी पैकी २ टक्के धूम्रपान करणारे भारतात आढळून आले आहेत.
निष्कर्षानुसार धूम्रपानाने आयुष्य होते कमी
धूम्रपानाच्या अभ्यासाच्या निष्कर्षाप्रमाणे, विडी ओढणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य ६ वर्षानी तर सिगारेट ओढणाऱ्याचे आयुष्य १० वर्षांनी कमी होते. दिवसाला १ ते ७ बिडी ओढल्यास मृत्यूचा धोका २५ टक्के वाढतो तर सिगारेट ओढल्यास हा धोका ५० टक्क्यांनी वाढतो.
विविध आजाराची लागण होणाची शक्यता
धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, दमा, श्वसनाचे आजार, हृदय कॉरोनरी आर्टरी डिसीज, हदयविकार, अनियमित ठोके, त्वचेवर सुरकुत्या पडणे, सोरायसिस, अन्ननलिका, स्वरयंत्र, मुख कर्करोग, युरिनरी ब्लॅडर, मुत्रपिंड, जठराचा कर्करोग, हाडे ठिसुळ होणे, सांध्याच्या ठिसुळपणा वाढणे, मोडलेले हाड भरून येण्यास विलंब लागणे, पुरुषामध्ये वंध्यत्व, शुक्रजंतुमध्ये दोष, स्त्रियात गर्भपात, वेळेच्या आधी मासिक पाळी बंद होणे, गर्भाशय अर्भकाची वाढ खुंटणे, अपुऱ्या दिवसाचे बाळंतपण, जन्मत: मोतिबिंदू होणे, रोग प्रतिकार शक्ती कमी होणे इत्यादी आजार होतात.

Web Title: The Government's Tobacco Loan is only on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.