ग्रा.पं. निवडणुकीचे लागले डोहाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 09:48 PM2019-02-18T21:48:55+5:302019-02-18T21:49:15+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी येत्या मार्च महिन्यात जिल्ह्यातील तब्बल २९८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. शिवाय विविध राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीस सुरूवात झाल्याचे चित्र बघावयास मिळते. यातच यंदा पहिल्यांदा अनेक गावात मतदार थेट सरपंच निवडणार आहे. परिणामी, राजकीय पक्षाकडून सरपंच पदाचा उमेदवार निश्चित करण्यावर सध्या भर दिला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा निवडणुकीपूर्वी येत्या मार्च महिन्यात जिल्ह्यातील तब्बल २९८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. शिवाय विविध राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीस सुरूवात झाल्याचे चित्र बघावयास मिळते. यातच यंदा पहिल्यांदा अनेक गावात मतदार थेट सरपंच निवडणार आहे. परिणामी, राजकीय पक्षाकडून सरपंच पदाचा उमेदवार निश्चित करण्यावर सध्या भर दिला जात आहे.
निवडणूक होणाऱ्या सर्वात जास्त ग्रामपंचायतींची संख्या हिंगणघाट आणि वर्धा तालुक्यातील असून त्यापाठोपाठ निवडणूक होणाºया ग्रामपंचायतींची संख्या देवळी तालुक्यातील आहे. मार्च महिन्यात निवडणूक होणाºया ग्रामपंचायतींत आष्टी तालुक्यातील १७, कारंजा तालुक्यातील ३४, आर्वी २२, वर्धा ५६, देवळी ४६, सेलू ३१, हिंगणघाट ५६ तसेच समुद्रपूर तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राजकीय हालचालींचे चित्र पाहता भाजप, कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सक्रीय झाल्याचे दिसत आहे;पण कारंजा, आर्वी, आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायतींतली लढत कॉँग्रेस, भाजप तसेच शिवसेनेच्या समर्थक उमेदवारांत होईल. हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक प्रामुख्याने राष्टÑवादी कॉँग्रेस, भाजप, सेना समर्थक उमेदवारांत होईल. वर्धा तसेच देवळी तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक भाजप, कॉँग्रेस तसेच सेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या समर्थक उमेदवारांत होईल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत राजकीय शक्ती पणाला लावणार आहे. या ग्रा.पं.च्या निवडणुकीकरिता मतदारांची प्रारूपयादी १४ रोजी प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहे. अंतिम मतदारयादी २१ फेब्रुवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
जिल्ह्यात ५१९ ग्रामपंचायती आहेत. यातील निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लोकसभा निवडणुकीपूर्वी होणार असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाडाच प्रत्येक गाव बनणार आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच याच महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू होईल, असे सांगितले जात आहे.
२९८ गावांतील राजकीय गटातटांचे राजकारण सुरू होणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे संदर्भ लक्षात घेता ग्रामपंचायतीत आपल्याच समर्थकांची सत्ता यावी, याकरीता कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे.
प्रशासनाची कसरत
केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी यादी तयार करण्याचे काम सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाची चांगलीच कसरत होत आहे. तलाठ्यामार्फंत मतदार याद्या बनविण्याचे काम सुरू आहे. त्यातच आता निवडणुकीची तयारीही प्रशासनाला करावी लागत आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच दमछाक होत आहे.