ग्रामपंचायत सचिवाकडून नागरिकांची दिशाभूल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:48 PM2018-01-28T23:48:48+5:302018-01-28T23:48:59+5:30

लोकांनी निवडून दिलेल्या सरपंच व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालणाऱ्या ग्रा.पं.च्या कामाकडे लक्ष ठेवण्याचे कार्य शासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक पार पाडतो. परंतु, प्रजासत्ताक दिली ग्रामसभा असल्याचे सांगून ग्रा.पं. कार्यालय कुलूपबंद राहिल्याने ग्रा.पं. सचिव नागरिकांची दिशाभूल करतात काय,

Gram Panchayat Secretary misguided citizens? | ग्रामपंचायत सचिवाकडून नागरिकांची दिशाभूल?

ग्रामपंचायत सचिवाकडून नागरिकांची दिशाभूल?

Next
ठळक मुद्देग्रामस्थांचा सवाल : चौकशी करून कार्यवाहीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
रसुलाबाद : लोकांनी निवडून दिलेल्या सरपंच व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालणाऱ्या ग्रा.पं.च्या कामाकडे लक्ष ठेवण्याचे कार्य शासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक पार पाडतो. परंतु, प्रजासत्ताक दिली ग्रामसभा असल्याचे सांगून ग्रा.पं. कार्यालय कुलूपबंद राहिल्याने ग्रा.पं. सचिव नागरिकांची दिशाभूल करतात काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कार्यवाहीची मागणी आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वी गावात दवंडी देऊन प्रजासत्ताक दिनी सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. या दवंडीच्या माध्यमातून ग्रामस्थांना ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले. परंतु, ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर ९.२० वाजता सरपंच व सचिव सरळ कंचनपूर येथील शाळेतील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविण्यासाठी निघून गेले. नियोजित वेळेत ग्रामसभेसाठी ग्रा.पं. कार्यालयात आलेल्या नागरिकांना कार्यालयच कुलूप बंद असल्याचे दिसून आल्याने नागरिकांनीही आश्चर्य व्यक्त केले. बराच वेळ होऊनही ग्रा.पं. कार्यालय न उघडल्याने ग्रामसभेसाठी आलेल्यांने नागरिकांनी घरी जाणे पसंद केले. हा प्रकार निंदनिय असून याची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

Web Title: Gram Panchayat Secretary misguided citizens?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.