ग्रामशक्ती अन् युवाशक्तीने पेटविली श्रमसंस्काराची ज्योत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:55 PM2019-01-27T23:55:26+5:302019-01-27T23:56:25+5:30

येथील शिक्षा मंडळद्वारा संचालित श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे ‘राष्ट्रीय एकात्मता व स्वच्छ भारत अभियानासाठी युवाशक्ती’ शिबिर आर्वी तालुक्यातील पानवाडी येथे घेण्यात आले. या शिबिरातील युवक-युवतींनी युवाशक्तीसोबतच ग्रामशक्तीलाही सोबत घेत श्रमसंस्काराची ज्योत पेटविली आहे.

Gram Shakti and youth power | ग्रामशक्ती अन् युवाशक्तीने पेटविली श्रमसंस्काराची ज्योत

ग्रामशक्ती अन् युवाशक्तीने पेटविली श्रमसंस्काराची ज्योत

Next
ठळक मुद्देपानवाडीवासीयांची जिंकली मने : जाजू महाविद्यालयाचे रासेयो शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील शिक्षा मंडळद्वारा संचालित श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे ‘राष्ट्रीय एकात्मता व स्वच्छ भारत अभियानासाठी युवाशक्ती’ शिबिर आर्वी तालुक्यातील पानवाडी येथे घेण्यात आले. या शिबिरातील युवक-युवतींनी युवाशक्तीसोबतच ग्रामशक्तीलाही सोबत घेत श्रमसंस्काराची ज्योत पेटविली आहे. ती ज्योत शिबिरानंतरही कायम असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.
या शिबिराचे उद्घाटनाप्रसंगी प्रा.डॉ.झिले, सभापती शिला पवार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कालभूत उपस्थित होते. या शिबिराच्या कालावधीत ग्रामस्थ व शिबिरार्थ्यांनी श्रमसंस्कारांतर्गत गावातील नाल्यांचे खोलीकरण, रुंदिकरण व साफसफाई केली. नदीवरील बंधाऱ्यात साचलेला गाळ उपसून बंधारा मोकळा केला. गावातील रस्ते आणि तुंबलेल्या नाल्यांची सफाई करुन ‘हगणदारी मुक्त गांव’ करण्यासाठी गावाबाहेरील रस्ताही स्वच्छ केला. कोंडवाडाही स्वच्छ करून ‘निर्मलग्राम व स्वच्छग्राम’ चा संदेशही शिबिरार्थ्यांनी आपल्या कार्यातून दिला. ग्रामसर्वेक्षणाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन संवाद साधला. गावकºयांची आरोग्य तपासणी, नेत्रतपासणी व आरोग्य निदान शिबिरही घेण्यात आले. पशुचिकित्सा कृती शिबिर, कृषी अवजार, ग्रंथप्रदर्शन व रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. गावकºयांसाठी विकासाची नांदी ठरलेल्या या शिबिराच्या समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कालभूत यांच्या अध्यक्षेतत झाला. यावेळी ग्रामस्थांसह शिबिरार्थ्यांनी आले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक व अहवाल वाचन शिबिर प्रमुख डॉ. राजेश देशपांडे यांनी केले. संचालन प्रा. सलीम शेख यांनी केले तर आभार प्रा. मिलिंद माने यांनी केले. या भावस्पर्शी सोहळ्यानंतर विविध रचनात्मक कार्याचा वसा आपल्या आयुष्यात जपण्याचा संकल्प शिबिरार्थ्यांनी केला. शिबिराच्या आयोजनाकरिता प्राचार्य डॉ. कालभूत यांच्या मार्गदर्शनात डॉ. राजेश देशपांडे, प्रा.मिलिंद माने, डॉ. किनखेडकर, डॉ. चौहान, प्रा.सॅम्युअल, प्रा. उपासे, प्रा.वरकल, प्रा. येल्टीवार, प्रा.घमेंडी, प्रा. जक्कुलवार, सरपंच वंदना ढोक, उपसरपंच मसराम, मुख्याध्यापक पेंडके, शेळके, उपप्राचार्य पवार, भुतडा, लाहोटी, अली, धुर्वे, पटेल, तुमडाम, ढोक, चोपडे, भिवगडे तसेच पानवाडी येथील ग्रामस्थ व शिबिरार्थ्यांनी सहकार्य केले.

सकाळी जागर, तर रात्री प्रबोधन
दररोज पहाटे मंगल भूपाळी व्हायची. चिंतनाचे हृदयस्पर्शी विचार घेऊन शिबिरार्थी आणि ग्रामस्थांची गावातून जागर दिंडी निघायची.‘चाहे धर्म अनेक है, देश हमारा एक है’,‘जर्दा गुटका पान मसाला, नव्या पिढीचा मौत मसाला’ आदी घोषणांनी व प्रेरणादायी ‘जोडो भारत जोडो भारत...’ या स्फू र्ती व जागरगीतांनी पानवाडीचा परिसर दुमदुमून जायचा. सायंकाळी मनोरंजनातून लोकप्रबोधन केले जायचे. रासेयोच्या सांस्कृतिक कलापथकाने भोंदूबाबाची भंबेरी, स्त्रीभ्रूणहत्या, गांधी तुम्हारे देश में, थांबा काय करता, आपण सारे एक, ग्रामस्वच्छता इत्यादी विषयावर पथनाट्य, नकला, जागरगीत, लोकनृत्य व देशभक्तीपर गीत सादर केलीत. सोबतच सप्तखंजिरी वादक भाऊसाहेब थुटे व शुभम मुरले यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमही घेण्यात आला. ग्रामस्थ, गुरुदेव सेवा मंडळ आणि पानवाडी, भादोडच्या शाळांचेही कार्यक्रम झालेत.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून मिळाली दिशा
शिबिर कालावधीत प्रा. राजेंद्र खर्चे, डॉ. रवींद्र हवा, डॉ. प्रशांत धरपाल या तज्ज्ञांनी कृषीविषयक मार्गदर्शन केले. डॉ. गजानन पाटे, राहाटे व धाड यांनी डोळ्यांच्या आजाराबाबत माहिती दिली. तर विनेश काकडे यांनी ग्रामविकासावर मार्गदर्शन केले. यासह परिसंवाद, गटचर्चा, समयस्फूर्त भाषण, सामाजिक खेळ आदी उपक्रमही राबविण्यात आले.

Web Title: Gram Shakti and youth power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.