भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी ग्रामगीता हाच उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 10:29 PM2018-02-25T22:29:36+5:302018-02-25T22:29:36+5:30
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आयुष्यभर समाजोन्नतीसाठी झिजले. साहित्यातून ग्रामीण जीवनाचा पाया मजबूत करण्यावर भर दिला. समाजपरिवर्तनाच्या विचारातून ‘ग्रामगीता’ लिहिली.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आयुष्यभर समाजोन्नतीसाठी झिजले. साहित्यातून ग्रामीण जीवनाचा पाया मजबूत करण्यावर भर दिला. समाजपरिवर्तनाच्या विचारातून ‘ग्रामगीता’ लिहिली. ग्रामोन्नती साधायची असेल तर खेड्यात जाऊन प्रबोधन करावे लागेल हे जाणून राष्ट्रसंतांनी गावागावांत जावून प्रचार केला. ग्रामस्वच्छतेचा मंत्र दिला. यामुळे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी ग्रामगीता हाच उपाय आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
देवळी तालुक्यातील अडेगांव येथे देवळी पंचायत समिती सभापती विद्या भुजाडे व गुरुदेव सेवा मंडळ तसेच अडेगांव ग्रामवासीयांतर्फे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामजयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिमित्त समाज प्रबोधनाचा कार्यक्रम व खासदार विकास निधींतर्गत हायमास्ट व डस्टबीनचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकशाहीर अन्नाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष मधुकर कांबळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. शिक्षण सभापती जयश्री गफाट, पंचायत समिती सभापती विद्या दशरथ भुजाडे, माजी सभापती मिलींद भेंडे, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक फुलकरी, जि.प.सदस्य मयुरी मसराम, जि.प. सदस्य वैशालीताई येरावार, भाजपा तालुका सरचिटणीस दशरथ भुजाडे, सरपंच मारोती लोहवे, समय बिजवार उपस्थित होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अन्नाभाऊ साठे, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर खासदार विकास निधी अंतर्गत हायमास्ट व डस्टबीनचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी समाजप्रबोधनकार पंकजपाल महाराज यांचा सप्तखंजेरीचा कार्यक्रम संपन्न झाला.
उद्घाटीय भाषणात मधुकर कांबळे यांनी शासनाच्या योजणा सर्वसामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजे व समाजातील दुर्बल घटकांना सोबत घेऊन गावाचा विकास साद्य करायला पाहिजे असे प्रतिपादन केले.
गुरुदेव सेवा मंडळ व अहिल्याबाई होळकर युवक मंडळाच्यावतीने प.स.सभापती विद्या भुजाडे, मुरदगांवचे सरपंच गजानन हिवरकर, इसापूर येथील सरपंच प्रणिता आंबटकर, चिखलीच्या सरपंच नंदाताई तुपे, कोळोणा चोरेचे सरपंच उषाताई भल्मे, उमेद अभियानच्या दयाताई विरपाते व गावातील दारुबंदी महिला मंडळ व युव मंडळाचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अरविंद झाडे यांनी केले तर प्रास्ताविक दशरथ भुजाडे यांनी केले. उपस्थितांचे आभार संजय देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला अडेगांव व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
‘ग्रामगीता’ गाव स्वावलंबी करणारी गुरुकिल्ली
आदर्श गावाचे सुरेख चित्र रेखाटणारी ग्रामगिता आज आपल्या विस्मरणात गेली आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून ग्रामीण विकासाची संकल्पावर मांडली. सरकार ग्रामीण भागाच्या विकासाची योजना आखत आहे. या योजनांची इतरांना सुध्दा लाक्ष घ्यावा असे आवाहन यावेळी खासदारांनी केले आहे.