शुक्रवारी महामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:37 AM2018-04-19T00:37:01+5:302018-04-19T00:37:01+5:30
देशभरात विविध ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या आहे. असे असताना सरकारकडून कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. ‘बेटी बचाओ’चा नारा देणाऱ्या भारत सरकारने या सर्व घटनांवर मौन बाळगले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशभरात विविध ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या आहे. असे असताना सरकारकडून कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. ‘बेटी बचाओ’चा नारा देणाऱ्या भारत सरकारने या सर्व घटनांवर मौन बाळगले आहे. या घटनांच्या निषेधार्थ वर्धा शहरात कौमी एकता मंचाच्या नेतृत्वात ३५ सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून २० एप्रिल रोजी महामोर्चा काढण्यात येत आहे.
मोर्चा दुपारी २ वाजता बजाज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार असल्याचे पत्रपरिषदेत सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नूतन माळवी, युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, मुस्लीम सोशल फोरमचे प्रा. खलील खतीब, जिजाऊ ब्रिगेडच्या योगिता इंगळे, महाराष्ट्र अंनिसच्या अॅड. पूजा जाधव, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वैष्णवी डाफ, सलीम कुरेशी, सुधीर गिºहे, निरज कुटे, वंदना गावंडे, अविनाश काकडे, रिजवान पठान, मोहम्मद अक्रम, मोहम्मद शकील आदींनी सांगितले.
या महामोर्चात विविध जाती धर्माचे लोक व सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढून सरकारचाही निषेध करण्यात येणार आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे, मुस्लीम महिला संंघटनेच्या महिला या मोर्चात सहभागी होतील, अशी माहितीही मुस्लीम संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिली. केळझर जवळील दहेगाव (गोसावी) येथील शुभांगी उईके हत्या प्रकरणाबाबतही याद्वारे आवाज उठविला जाणार आहे.