नातवाच्या मृत्यूप्रकरणी आजीवर गुन्हा

By admin | Published: July 16, 2016 02:20 AM2016-07-16T02:20:59+5:302016-07-16T02:20:59+5:30

तीन महिन्यांच्या बाळाला ओढाताण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे म्हणत बाळाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली.

Grandfather's offense | नातवाच्या मृत्यूप्रकरणी आजीवर गुन्हा

नातवाच्या मृत्यूप्रकरणी आजीवर गुन्हा

Next

सुनेच्या तक्रारीवरून चौकशी : वैद्यकीय अहवालावरून पोलिसांची कारवाई
वर्धा : तीन महिन्यांच्या बाळाला ओढाताण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे म्हणत बाळाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी केलेल्या तपासात बाळाच्या मृत्यूला आजी कारणीभूत असल्याचे म्हणत तिच्यावर भादंविच्या कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या आजीचे नाव कौशल्या पितके (६५) रा. रसुलाबाद असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रसुलाबाद येथील चंद्रकांत पितके यांचा तीन महिन्यांचा मुलगा सौरभ याचा १५ जून २०१६ रोजी पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी बाळाच्या आईच्या तक्रारीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चौधरी यांनी केला. तपासादरम्यान या प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल मागविण्यात आला. या अहवालानुसार बाळाला ओढाताण केल्यामुळे त्याच्या फुफ्फुसाला जखम झाली. यामुळे त्याच्या छातीत रक्त गोठल्याने त्याला श्वास घेण्यात त्रास होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमुद करण्यात आले आहे. या अहवालावरुन पोलिसांनी तपास केला असता सदर बाळ हे कौशल्या पितके यांच्या ताब्यात असताना त्याला ओढाताण केल्यामुळे त्याच्या फुफ्फुसाला जखम झाल्याचा आरोप मुलाच्या आईने केला. यावरून पोलिसांनी कौशल्या पितके यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

फुफ्फुसात रक्त गोठले
मृत्यू झालेल्या बालकाच्या फुफ्फुसात जखम झाल्याने त्याचे रक्त गोठले. यामुळे त्याला श्वास घेता आला नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Web Title: Grandfather's offense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.