आजी माजी आमदारांच्या भूमिकेमुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:12+5:30
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून आर्वी शहराची ओळख होवू लागली आहे. जिल्ह्यातील पहिला कोरोना रूग्ण हिवरा (तांडा) येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यूमुखी पडली तेव्हापासून आजपर्यंत आर्वी तालुक्यात व शहरात ९९ रूग्ण आढळले ५ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेवून उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शहरातील सर्व वैद्यकीय व्यवसायीक, औषध विक्रेते, व्यापारी यांची कोरोना ‘अॅन्टी रॅपीड टेस्ट’ करण्याचे आदेश २६ जुलैला काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : शासनाच्या ‘अॅन्टी रॅपीड टेस्ट’ कोरोनाची सक्तीची तपासणी आजी-माजी आमदारांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे बारगळल्याने आर्वीकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता शहरातील डॉक्टरर्ससह सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून आर्वी शहराची ओळख होवू लागली आहे. जिल्ह्यातील पहिला कोरोना रूग्ण हिवरा (तांडा) येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यूमुखी पडली तेव्हापासून आजपर्यंत आर्वी तालुक्यात व शहरात ९९ रूग्ण आढळले ५ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेवून उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शहरातील सर्व वैद्यकीय व्यवसायीक, औषध विक्रेते, व्यापारी यांची कोरोना ‘अॅन्टी रॅपीड टेस्ट’ करण्याचे आदेश २६ जुलैला काढले. त्याकरीता स्थानिक गांधी विद्यालय व मॉडेल हायस्कूल येथे वैद्यकीय शिबिर लावण्यात आले. जवळपास ३ दिवसांत १४३६ तपासणी सुद्धा केली गेली गेली परंतु शहरातील मोठ्या व्यापाºयांनी या सक्तीच्या तपासणीस विरोध दाखविला. त्याकरीता व्यापाऱ्यांनी आजी-माजी आमदाराच्यामार्फत शासकीय यंत्रणावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यात माजी आमदारांच्या प्रयत्नांना यश येवून पालकमंत्री सुनील केदार यांच्या मध्यस्थीतून येथील उपविभागीय अधिकारी हरिष धार्मीक यांच्या मार्फत व्यापाऱ्यांना सक्तीच्या तपासणीतून सुट देण्याचे तोंडी आदेश देण्यात आले. यावेळी माजी आमदारांच्या निवासस्थानी व्यापाऱ्यांच्या मोठ्या जमावासह तहसीलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते. परंतू असे असले तरीही उपविभागीय अधिकाऱ्यांनी २६ जुलैचा आदेश मात्र मागे घेतला नाही. या संपूर्ण घडामोडीवर येथील महाराष्ट्र आय.एम.ए.चे माजी अध्यक्ष डॉ.अरूण पावडे, कृषक शिक्षण संस्थेच्या सचिव अॅड.शोभा काळे, मदत फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.हरिभाऊ विरूळकर, डॉ. शाम भुतडा, अनेक स्वयंसेवी संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.
या सर्व लढाईत कोरोना जिंकला असे नमूद करून या निमित्ताने सर्व राजकीय, सामाजिक, स्वयंसेवी, व्यवसायिक संघटना व प्रशासनाने एकत्र बसून योग्य मार्ग काढून कोरोनावर मात करण्यासोबत एक ‘मॉडेल’ इतरांना दिला पाहिजे, की जेणेकरून ५० हजार लोकसंख्याच्या आर्वी शहराला हे शक्य आहे, असे मत आय एम ए चे माजी अध्यक्ष डॉ. अरूण पावडे यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या नावावर गैरप्रकार होत असल्याचा आरोप
कोरोनाच्या नावावर देशात मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचे दिसून येते मात्र रुग्णांना पाहिजे तशी सुविधा मिळत नाही. प्रशासनाच्या विरुध्द तक्रारीत सुध्दा वाढ झालेली आहे याची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी टिटु मोटवाणी यांनी केली आहे. मोटवाणी यांनी या मागणीकरीता गांधी चौकातील जयस्तंभाजवळ एक दिवसाचे उपोषण केले. नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देऊन सुमारे तिनशेच्यावर नागरिकांच्या सह्याचे निवेदन प्रशासनाला दिले आहे. घरातील एक व्यक्ती जरी कोरोना बाधीत निघाला तर संपुर्ण प्रशासन व त्यांची वाहने त्या व्यक्तीच्या घरासमोर येवून उभी राहतात. यामुळे रुग्णाला व त्यांच्या कुटूंबियांमध्ये आपण फार मोठे गुन्हेगार आहोत की काय अशी भावना निर्माण होते. यावेळी आजुबाजुचे लोक सुध्दा त्याच्याकडे दृष्ट भावनेने पाहतात. संस्थात्मक विलगीकरणाच्या ठिकाणी निकषाप्रमाणे व्यवस्था केली जात नाही मात्र लाखो रुपयाचा बिल काढल्या जाते असा आरोप टिटु मोटवाणी यांनी केला आहे. या प्रकाराची उच्चस्तरावरुन चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.