विविध समस्यांनी ग्रासले गोविंदपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:05 PM2018-08-19T22:05:34+5:302018-08-19T22:06:16+5:30

देशभरात स्वच्छतेचा जागर होतोय, शहर स्वच्छ होत आहे. मात्र ग्रामीण भागाला स्वच्छतेचा गंध लागलेला नाही. याचे उत्तम उदाहरण वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील गोविंदपूर या गावात बघायला मिळते. या गावात पाय ठेवताच सांडपाण्याचे पाट गल्लोगल्लीतून वाहतांना दिसतात.

Grasley Govindpur with various problems | विविध समस्यांनी ग्रासले गोविंदपूर

विविध समस्यांनी ग्रासले गोविंदपूर

Next
ठळक मुद्देमूलभूत सुविधांचा अभाव : नागरिकांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशभरात स्वच्छतेचा जागर होतोय, शहर स्वच्छ होत आहे. मात्र ग्रामीण भागाला स्वच्छतेचा गंध लागलेला नाही. याचे उत्तम उदाहरण वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील गोविंदपूर या गावात बघायला मिळते. या गावात पाय ठेवताच सांडपाण्याचे पाट गल्लोगल्लीतून वाहतांना दिसतात. दुर्गंधी, अस्वच्छतेने तर कळसच गाठला आहे. अशाही अवस्थेत ग्रामवासी आपला जीवनक्रम चालवित आहे. ग्रामस्थांना होणारा त्रास लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दृष्टीआड केला आहे. गोविंदपूरची लोकसंख्या ४०० ते ५०० च्या घरात आहे. आजवर गावात एक-दोन नाल्या बांधण्यात आल्या. पण त्याही बुजलेल्या स्थितीत आहे. शिवाय त्याच्या जोडीला गावातील अतिक्रमण आहे. यात मंजूर झालेला रस्ता गावातील काही विघ्नसंतोषी होवू देत नाहीत. गावातील रस्त्यांवर पथदिवे लावलेत; मात्रे सतत बंदच असतात. यामुळे गावकऱ्यांना रात्री हातात टॉर्च घेवून प्रवास करण्याची वेळ आली आहे. गोविंदपूर हे गाव गट ग्रामपंचायतीत येत असल्याने समस्या कायम असल्याचे बोलले जात आहे.
स्मशानभूमीचा रस्ताच हरविला
येथील स्मशासनभूमीचा रस्ताच अक्षरश: हरविल्याचे चित्र दिसते. गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी कुठे करावा अशा प्रश्न येथील नागरिकांना पडतो. तसेच या स्मशानभूमीच्या आजूबाजूला एवढी घाण, पाण्याचे डबके व कचरा वाढला आहे. मोठ मोठी झाडे व झुडपे तयार झाली आहे. यामुळे येथे अत्यंविधी करताना अनेक समस्यांना तोंड देत कसा तरी अंत्यविधी पार पाडावा लागतो. याबाबत ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने येथे अनेक समस्यांनी तोंड वर काढले आहे. स्मशानभूमीची स्वच्छता करावी व रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहे.
नाल्या तुंबलेल्या
गावात एक दोन नाल्या आहेत़ पण त्या तुंबल्या असल्याने नाल्यालगत असलेल्या घरांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या नाल्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. या घाणीमुळे साथीचे रोग होण्याची शक्यता बळावली आहे. नाल्यांमध्ये झुडूपे तयार झाली असून ग्रामपंचायत प्रशासनाने ती कधी तोडलीच नसल्याचे नागरिक सांगत आहे.
अतिक्रमणामुळे अडथळे
गावात अनेकांनी अतिक्रमण केल्यामुळे मोठा रस्ता अक्षरश: गल्लीत बदलला आहे. ज्या रस्त्याने कधी काळी बैलगाडी जात होती त्या रस्त्यावर आता पायी चालणेही कठीण आहे़ याच गल्लीबोळ्यातून लोकांच्या घरातील सांडपाणी येत आहे. गावात ये-जा करण्यासाठी एक रस्ता मंजूर झाल्याची माहिती आहे. या रस्त्यामुळे अनेकांचे अतिक्रमण झाल्याने ते पडण्याची शक्यता असल्याने त्यांच्याकडून या कामाला आडकाठी होत आहे.
गावातील मुख्य रस्त्यावर चिखल
गावात प्रवेश करणाºया मुख्य रस्यावर चिखल असल्याने पायदळ चालणे कठीण होत आहे़ नागरिकांच्या स्वच्छतागृहातील पाणी रस्त्यावर येत असल्याने त्याची गावात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे़ गावातून जाणाºयांना नाकाला रूमाल लावून रस्त्याच्या काठाकाठाने कसे बसे आपले घर गाठावे लागते आहे. येथील नागरिकांनी गावात नाल्या नसल्यामुळे नाईलाजास्तव रस्त्यावर सांडपाण्याचे पाईप काढावे लागत आहे़
मुख्य चौकातही घाणच घाण
गोविंदपूर गावातील मुख्य चौकात घाणच घाण पसरल्याचे दिसून येते. पावसाळ्याच्या दिवसात घराच्या बाहेर निघावे की नाही असा पेचात येथील नागरिक पडते. गावात चोहीकडे चिखलच पसरला आहे. येथे वाहन तर सोडाच साधे पायी चालणे सुद्धा कठीण होते. पायी चालताना कुठे कुठे तर घुटण्यापर्यंत पाय फसतात. गावात पसरलेल्या घाणीमुळे साथीचे रोग होण्याची भिती बळावली आहे. गावातील नाल्या, रस्ते, हातपंप दुरूस्ती करावी अशी मागणी सुद्धा येथील नागरिकांनी केली आहे. तसेच याच परिसरात मुख्य चौकात हातपंप आहे. या हातपंपावर पाणी भरताना महिलांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. अनेकदा अनेक महिला पाय घसरून पडल्या व यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात इजा सुद्धा झाली आहे. यामुळे येथील नागरिकांना या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते. याकडे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: Grasley Govindpur with various problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस