पुन्हा एकदा निसर्गाने हिरावला शेतकऱ्याच्या तोंडचा घास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:13 AM2020-03-18T11:13:15+5:302020-03-18T11:13:39+5:30
मंगळवारी रात्री १० च्या सुमारास वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाच्या तोंडचा घास पुन्हा हिरावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: मंगळवारी रात्री १० च्या सुमारास वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाच्या तोंडचा घास पुन्हा हिरावला आहे. वर्षभर रात्रंदिवस मेहनत करून पिकवलेले पीक पावसाच्या एका फटक्यात आडवे झाले आहे. वर्धा परिसरात कपासी, गहू, चना, कांदा, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्ग पोटावर मारतो व शासन पाठीवर असे विदारक दृश्य आहे.
मदतीची अपेक्षा
निसर्गाच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांंचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सध्या विदर्भात दिसत आहे. सध्या राज्यात व केंद्रात वेगवगळ्या पक्षाचे सरकार असुन त्यांनी शेतकऱ्यांचे दु:ख समजुन घेणे गरजेचे असुन आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.